तिकिट आरक्षण महागलं

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, February 26, 2013 - 15:23

www.24taas.com, नवी दिल्ली
२०१३-१४च्या रेल्वे बजेटमध्ये आरक्षित तिकिटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. एसी-३ कोचच्या रिझर्वेशन तिकिटामध्ये १५ रुपयांनी वाढ करण्यातच आली आहे, तर एसी-२ आणि एसी-१ कोचच्या तात्काळ रिझर्वेशनासाठी २५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
सुपर फास्ट रेल्वेंच्या तिकिटांमध्येही वाढ करण्यात आली आहे. स्लीपर कोचच्या तिकिटांमध्ये १० रुपयांची वाढ झाली आहे. एसी-३ आणि एसी-२ कोचच्या तिकिटांत १५ रुपयांनी वाढ झाली आहे. एसी-१ कोचच्या तिकिटांत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
तात्काळ आरक्षण करणेही आता महाग झालं आहे. स्लीपर कोचचं तात्काळ आरक्षण २५ रुपयांनी महागलं आहे. एसी-३ कोचच्या तात्काळ आरक्षणासाठी ५० रुपये अधिक भरावे लागणार आहेत.एसी-२ कोचसाठी १०० रुपये वाढवण्यात आले आहेत. एसी-१ कोचसाठी मात्र तिकिटाच्या किमतीत कुठलीही वाढ करण्यात आली नाही.
रेल्वेच्या भाड्यात प्रत्यक्ष वाढ जरी दिसत नसली, तरी मागच्या दाराने वाढ करण्यात आली आहे. एसी-३ कोचच्या रिझर्वेशनमध्ये १५ रुपयांची वाढ झाली आहे, तर एसी-२ आणि एसी-१ कोचमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. सुपरफास्ट रेल्वेच्या स्लीपर कोचच्या किमतीत १० रुपयांची वाढ होत आहे. एसी-३ आणि एसी-२ कोचच्या किमतीत १५ रुपयांची वाढ झाली आहे. एसी-१ कोचच्या भाड्यात २५ रुपयांनी वाढ झाली आहे.

First Published: Tuesday, February 26, 2013 - 15:23
comments powered by Disqus