Tv Serial News

फक्त पुढचा एक महिना कपिल सोबत काम करणार सुनील ग्रोवर

फक्त पुढचा एक महिना कपिल सोबत काम करणार सुनील ग्रोवर

कपिल शर्मा, त्याचा शो आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये आता काहीच आलबेल नाही. दिवसेंदिवस त्याच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. 

पाच वर्षांच्या चिमुरड्याचे हनुमान चालिसा ऐकून हिमेश रेशमियाने दिला मोठा चान्स

पाच वर्षांच्या चिमुरड्याचे हनुमान चालिसा ऐकून हिमेश रेशमियाने दिला मोठा चान्स

 पाच वर्षाच्या मुलाने गायलेले हनुमान चालिसा ऐकून संगीतकार-गायक-अभिनेता हिमेश रेशमिया इतका प्रभावित झाला की त्याने लगेच त्याला एका गाण्यासाठी साइन केले. 

 अवधूत गुप्तेच्या स्वरांनी गुढीपाडव्याची रंगणार 'सरगम'

अवधूत गुप्तेच्या स्वरांनी गुढीपाडव्याची रंगणार 'सरगम'

 गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्त साधत  झी युवावर अवधूत गुप्ते त्यांच्या संगीताची गुढी सरगममध्ये  उभारणार आहेत.  या आठवड्यात २९ मार्च आणि ३० मार्च ला सरगमच्या प्रेक्षकांना एक वेगळाच स्वरानुभव मिळणार आहे. 

झी मराठीवर रंगणार सासू सुनांची खवय्येगिरी

झी मराठीवर रंगणार सासू सुनांची खवय्येगिरी

सण समारंभ म्हटलं घरामध्ये रेलचेल असते ती विविध पाककृती बनविण्याची. गोडधोड पदार्थ, चमचमीत रेसिपीज्, खमंग, खुसखुशीत पदार्थ बनविण्याची लगबग घराघरांत बघायला मिळते. यातही प्रत्येक सणाला काही तरी वेगळं आणि खास बनविण्याची इच्छा घरातील सुगरणींना असते. पण हे वेगळं काय यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. 

राधिकाने गुरुनाथ, अथर्वसह उभारली आनंदाची गुढी

राधिकाने गुरुनाथ, अथर्वसह उभारली आनंदाची गुढी

माझ्या नव-याची बायको ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे. शनायाला शह देण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका कसोशीने प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे. 

तुझ्यात जीव रंगला : राणादा-अंजली घरी परतणार

तुझ्यात जीव रंगला : राणादा-अंजली घरी परतणार

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलामधील राणादा आणि अंजलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या दोघांचं नुकतंच लग्न झालं परंतु लग्नानंतर राणाने आपल्या संसाराची सुरुवात शेतातील घरात करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्या या निर्णयामागे वहिनीचं कारस्थान होतं ज्याला राणा बळी पडला होता. राणाने थोरल्या सुनबाईसह घरी परतावं यासाठी राणाचे आबा प्रतापराव आणि गोदाक्का दोघेही विविध प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश येणार असून या राणा आणि अंजली गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहेत. त्यामुळे  मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते त्या गुढीपाडव्याचा आनंद गायकवाडांच्या घरातही पाहायला मिळणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त या मालिकेला नवं वळणं मिळणार आहे. 

सहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज

सहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज

सुनिल ग्रोवर आणि इतर कलाकारांसोबत झालेला कपिलचा वाद काही थंड व्हायला तयार नाही. त्यातच आता बॉलिवूडचे काही कलाकारांनीदेखील कपिलच्या शोमध्ये यायला नकार दिलाय. 

...हे भाऊ-बहिण करतायत एकमेकांना डेट!

...हे भाऊ-बहिण करतायत एकमेकांना डेट!

सध्या टेलिव्हिजन जगतातली एका भावा-बहिणीची जोडी चांगलीच चर्चेत आहे... कारण, रिल लाईफमध्ये हे भाऊ-बहिण म्हणून दिसत असले तरी रिअल लाईफमध्ये मात्र हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. 

युवराज - हेझलचं चाहत्यांसाठी सरप्राईज...

युवराज - हेझलचं चाहत्यांसाठी सरप्राईज...

टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची 'बलिए' अर्थात त्याची पत्नी अभिनेत्री हेजल किच लवकरच आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज देणार आहेत. 

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात काय बिनसलं..

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात काय बिनसलं..

 कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद वाढत आहे. याचा थेट परिणाम द कपिन शर्मा शो वर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनील ग्रोवरनंतर आता चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनीही शोवर बॉयकॉट टाकला आहे. आता कपिलला किकू शारदा आणि नवज्योतसिंग सिद्धूसोबत शुटिंग करणे भाग पडले. 

लव्ह लग्न लोचाची टीम होणार बेघर !!!

लव्ह लग्न लोचाची टीम होणार बेघर !!!

लव्ह लग्न लोचा ...ज्या मालिकेच्या नावातच लोचा आहे , तिथे लोचे होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मैत्रीचं प्रेम, लग्नातील मज्जा आणि या सगळ्यांतून होणारे लोचे हे आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग आहे.

'चला हवा येऊ द्या'मध्ये 'चंद्रविलास फाजिल'

'चला हवा येऊ द्या'मध्ये 'चंद्रविलास फाजिल'

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत अभिनेता भाऊ कदम हे 'चंद्रविलास फाजिल' या भविष्य सांगणाऱ्या महाराजांची भूमिका करतात.

डॉक्टर गुलाटी, चंदू चायवाला, नानीचाही 'कपिल'च्या कार्यक्रमाला दांडी...

डॉक्टर गुलाटी, चंदू चायवाला, नानीचाही 'कपिल'च्या कार्यक्रमाला दांडी...

 सुनिल ग्रोवर आणि कपिल शर्मामध्ये झालेल्या वादानंतर चंदन आणि अली अझगर हे दोन सहकलाकारही कपिलवर नाराज असल्याचं दिसतंय.

 कुशल बद्रिकेचा हिंदी गाण्यावर उषा नाडकर्णींसोबत डान्स

कुशल बद्रिकेचा हिंदी गाण्यावर उषा नाडकर्णींसोबत डान्स

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत दर आठवड्याला नवनवीन गोष्टी घडत असतात.

दिल दोस्तीच्या मित्रांची गोव्यात फुल्ल टू धमाल

दिल दोस्तीच्या मित्रांची गोव्यात फुल्ल टू धमाल

दिल दोस्तीचा दुसरा पार्ट अर्थात दिल दोस्ती दोबारा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. खयाली पुलाव या भन्नाट नावाचे हॉटेल चालवणारे हे सहा मित्र आणि हे हॉटेल चालवताना होणारे धम्माल किस्से यावर आधारित ही मालिका आहे. 

 “बंध रेशमाचे “प्रेम हे" ची चौथी कथा झी युवावर

“बंध रेशमाचे “प्रेम हे" ची चौथी कथा झी युवावर

प्रेमाची भाषा वेगळीच असते. ती सांगायला शब्द लागत नाहीत. प्रेम करणाऱ्यांना एकमेकांच्या नजरेतून प्रेम जाणवते. ही गोष्ट आहे दोन अश्या लोकांची ज्यांचे स्वतःचे आयुष्य एका वळणावर येऊन थांबले आहे. इशा आणि प्रसाद आणि यांच्यातील दुआ आहे प्रसादच पाळणाघर आणि ईशाचा मुलगा अद्वैत.

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये हाणामारी... कपिल म्हणतो...

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये हाणामारी... कपिल म्हणतो...

सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो मालिकेतील कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात भांडण होऊन मारामारी झाल्याची चर्चा सर्वत्र चालू असताना, हे भांडण घरगुती असून ते लवकरच मिटेल. त्यामध्ये कुणी जास्त दखल देण्याची गरज नाही, असे आपल्या फेसबूक पोस्ट द्वारे कपिल शर्माने शेअर केले आहे.

'चला हवा येऊ द्या'मध्ये हे 'मामा मामी'

'चला हवा येऊ द्या'मध्ये हे 'मामा मामी'

तेव्हा पुढे या मामा मामींचं काय झालं ते तुम्हीच पाहा. यांच्याकडे आयुर्वेदिक उपाय देखील आहेत ते धमाल आहेत.

'चला हवा येऊ द्या'मध्ये यांनी उधळले रंग

'चला हवा येऊ द्या'मध्ये यांनी उधळले रंग

 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम आणि भारत गणेशपूर तसेच कुशल बद्रिके यांनी रंग उधळले.

अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्याबेडीत

अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्याबेडीत

अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. निर्माता सुशांत तुंगारे आणि मनवाचे 'शुभमंगल' नुकतेच झाले. ही गोड बातमी दिली तिची मैत्रीण श्रेया बुगडे हिने.

आता कशी दिसते ही मालिकेतील 'झांसी की रानी'

आता कशी दिसते ही मालिकेतील 'झांसी की रानी'

'झासीं की रानी' या मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाई राणींची भूमिका साकारणाऱी उल्का गुप्ताचा चेहरा तुम्हाला आठवत असेल. उल्काच्या या भूमिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती.