जम्मू-काश्मीरमधील छुप्या युद्धाचे आर्थिक पैलू

जम्मू-काश्मीरमधील छुप्या युद्धाचे आर्थिक पैलू

पाकिस्तानव्याप्त काश्मिरातील काश्मिरी, गुलामाप्रमाणे गरीबग्रस्त, अशिक्षित आणि पंजाबी मुस्लीम उच्चवर्गाकरवी शोषित राहू शकतात. त्यांचा काही भूभाग चीनला दिलेला असतो, जो सर्व प्रगती आणि आधुनिक सुखसोयींपासून वंचितच राहत असतो. आपल्या काश्मीरमधील परिस्थितीला तेथील नागरिकच जबाबदार आहेत. एखाद्या आतंकवाद्यांच्या नादाला लागून हिंसक प्रदर्शन करणे चुकीचे आहे. काश्मीरमधील नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाशी एकरूप होणे खूप गरजेचे आहे. मूठभर, माथेफिरू आतंकवादी लोकांच्या धार्मिक भावना भडकावून त्यांना हिंसाचाराच्या मार्गावर नेतात. 

मागील 15 वर्षाच्या चिक्की खरेदीची आता चौकशी मागील 15 वर्षाच्या चिक्की खरेदीची आता चौकशी

मागील पंधरा वर्षात झालेल्या कथित चिक्की खरेदीची आता चौकशी होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर, कथित चिक्की खरेदी घोटाळा प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर, मागील पंधरा वर्षाच्या चिक्की खरेदीच्या चौकशीसाठी, मुख्य सचिव आणि दोन सचिव यांची समिती नेमली जाणार आहे.

विशेष संपादकीय : हॅलो ब्रदर, सलमान विशेष संपादकीय : हॅलो ब्रदर, सलमान

सध्या तुझा बजरंगी भाईजान 100 कोटींचे नवे विक्रम रचतोय. तिकडे आपल्या नवनवीन ट्विटमुळे तू आपल्या वादांचा नवा विक्रम रचतोय. हिट अँड रन प्रकरणी शिक्षा झालेल्या सलमानला अडीचशे निरपराधांच्या हत्येचा कट रचणारा याकूब 'भाईजान' वाटतो. 

विशेष संपादकीय : नाथा ‘बजरंगी’ला करमाफी नको आता! विशेष संपादकीय : नाथा ‘बजरंगी’ला करमाफी नको आता!

 

महसूलमंत्री श्री. नाथाभाऊ खडसे यांस...

Film Review : 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं नेमकं कारण Film Review : 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं नेमकं कारण

( जयवंत पाटील, झी २४ तास ) सलमान-करिना आहे पण रोमान्स नाहीय, मात्र....., सलमानच्या या सिनेमात शिट्या नाहीत, तर टाळ्या....., बोलता न येणारी सहा वर्षाची मुलगी पाकिस्तानात कशी परतणार.... नवाझु्द्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची नजाकत....'भाईजान इंटरनेट में बहुत बडी ताकत है'.... 'दुनिया में नफरत बडी जल्दी से बिकती है'....

मेघालय-महाराष्ट्र जोडणारा ज्ञानसेतू मेघालय-महाराष्ट्र जोडणारा ज्ञानसेतू

६ जून ते १८ जून या दरम्यान एक गट मेघालयला जाणार म्हणून मे महिन्यापासूनच बैठकी सुरु झाल्या होत्या.

एका बॅगने एकटीने केला सीएसटी ते कोपर  प्रवास... एका बॅगने एकटीने केला सीएसटी ते कोपर प्रवास...

प्रशांत जाधव

प्रशांत जाधव, संपादक, 24TAAS.COM

आता मोदींनाही पाकचा पापा? आता मोदींनाही पाकचा पापा?

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्षभराच्या अंतराने पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना रशियातील युफा येथे भेटले. नुसते भेटलेच नाही तर त्यांनी शरीफ यांच्याशी तासभर चर्चादेखील केली. तेवढ्यावरच प्रकरण थांबले असते तर गोष्ट वेगळी होती.

शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

(जयवंत पाटील, झी 24 तास) मोबाईल फोन हरवल्यानंतर काय होतं?, याचा अनुभव फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतरच येतो. तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

भाजपचा हनीमून पिरियड संपला, आता सत्तेचे चटके भाजपचा हनीमून पिरियड संपला, आता सत्तेचे चटके

राज्यात विरोधी पक्ष म्हणून वावरतांना भाजपाला सत्ताधा-यांवर आरोपांची माळ लावायची सवय होती. मात्र एकामागोमाग झालेल्या आरोपामुळे सत्तेत असलेला भाजप मनातून धास्तावला आहे. भाजपचा हनीमून पिरियड संपला असून आता त्यांना सत्तेचे चटके जाणवायला सुरूवात झालीय. 

डॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच! डॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच!

 डॉ. संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून निवड करण्यात आल्याचे वाचून (सुखद) आश्चर्याचा धक्काच बसला. धक्का अशासाठी की, गेली अनेक वर्षं विद्यापीठाबद्दल चांगलं असं काही वाचनात येतच नव्हतं. २००५-०६ साली जेव्हा मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या एका प्रकल्पात संयोजक म्हणून काम करत होतो, तेव्हा डॉ. देशमुखांनी प्रबोधिनीतील संशोधन संचालकपद सोडून २ वर्षं झाली होती. तरी वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यातून निर्माण झालेले मैत्रीचे नाती अगदी आजपर्यंतटिकून आहे. हीच गोष्टं त्यांना ओळखणारे अनेक जणं सांगतील – मग त्यात सुमारे ८-१० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर सकाळी ८.०८च्या ठाणे फास्ट लोकलने प्रवास करणारा ग्रुप असो...त्यांचे शाळा किंवा कॉलेजमधील मित्र असोत... विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील त्यांचे सहकारी असोत वा ते संलग्न असलेल्या सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते असोत. जीवनात आपण जसजशी पुढे वाटचाल करतो तशी मागे घट्ट असलेल्या नात्यांच्या गाठी सैल व्हायला लागतात... आपली इच्छा नसून सुद्धा आपण ते टाळू शकत नाही. पण या नियमाला डॉ. देशमुख अपवाद ठरतात.दरवेळेस जेव्हा मी त्यांना भेटायला जातो, तेव्हा त्यांच्यासोबत १०/२०/३० वर्षांपूर्वी काम केलेली वेगवेगळी लोकं भेटतात आणि एवढी जुनी नाती आजही किती घट्ट आहेत याचा प्रत्यय येतो.

हॅलोsss मी तुम्हांला गंडा घालणार आहे... हॅलोsss मी तुम्हांला गंडा घालणार आहे...

सर, मी सर्व्हिस प्रोव्हाडरकडून बोलते आहे. तुमच्या क्रेडीट कार्डवर आम्ही एक स्पेशल ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्हाला सहा बेनिफिट मिळणार आहे. या सहा बेनिफिटची माहिती मी तुम्हांला देऊ शकते का..

सलमान भेटीनंतर आमीरला 'सत्यमेव जयते'वरून सवाल सलमान भेटीनंतर आमीरला 'सत्यमेव जयते'वरून सवाल

आमीर खानचा 'सत्यमेव जयते' हा रियालिटी शो चांगलाच गाजला, सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम होता, अनेक सामाजिक विषय  'सत्यमेव जयते'मध्ये हाताळण्यात आले होते. यात दारूचं व्यसन ते रस्ते अपघात असे विषय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले होते.

औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये

(तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल

आवाज कुणाचा? आवाज कुणाचा?

( दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई ) लोकसभा निवडणुकीत केंद्रात एक हाती सत्ता आणि त्यानंतर 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतची सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. राज्यातील जनता आता आपल्याबरोबरच आहे असा समज भाजपाला झाला होता.

'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य 'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य

(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबईत घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत इच्छुकांना सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र म्हाडाच्या नावाने एक बनावट वेबसाईट आल्याने, लोकांमध्ये थोडा गोंधळ दिसून येत आहे.

ब्लॉग : 'टॅक्सी'वाल्या ठकसेनांची टोळी... ब्लॉग : 'टॅक्सी'वाल्या ठकसेनांची टोळी...

दादरमध्ये ठकसेनांची टोळी... खरं वाटत नाही... या ठकसेनानी मलाही गंडा घातला होता... दादर पूर्व येथील टँक्सी स्टॅडवर हे ठकसेन ड्रायव्हर म्हणून काम करतात. 

'नेट न्यूट्रॅलिटी' इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी किती महत्वाची? 'नेट न्यूट्रॅलिटी' इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी किती महत्वाची?

(जयवंत पाटील, झी २४ तास) 'नेट न्यूट्रॅलिटी'वरून देशभरात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. इंटरनेट कॉलिंगसाठी टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळा डाटा चार्ज लावण्यास सुरूवात केली आहे, कंपन्या वेब सर्फिंगमधून जास्त पैसे वसुल करू इच्छीत आहेत, मात्र ट्रायने 'नेट न्यूट्रॅलिटी'वर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. 

कडोंमपा, आहे तिथेच... कडोंमपा, आहे तिथेच...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आपला मोर्चा नवी मुंबई, औरंगाबाद, अंबरनाथ , बदलापुर वगैरे अशा ठिकाणी प्रचारासाठी वळवतील. 23 एप्रिलला निकाल लागतील. मग त्यांनतर चार महिन्यांत राज्यात त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजेच कडोंमपाची निवडणूक असल्याने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले असेल.

ब्लॉग: किसका साथ किसका विकास ? ब्लॉग: किसका साथ किसका विकास ?

राज्यात जाचक भूसंपादन कायदा कुणासाठी झाला लागू...

दीपक भातुसे