Blogs

आता मोदींनाही पाकचा पापा?

आता मोदींनाही पाकचा पापा?

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्षभराच्या अंतराने पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना रशियातील युफा येथे भेटले. नुसते भेटलेच नाही तर त्यांनी शरीफ यांच्याशी तासभर चर्चादेखील केली. तेवढ्यावरच प्रकरण थांबले असते तर गोष्ट वेगळी होती.

शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

(जयवंत पाटील, झी 24 तास) मोबाईल फोन हरवल्यानंतर काय होतं?, याचा अनुभव फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतरच येतो. तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

भाजपचा हनीमून पिरियड संपला, आता सत्तेचे चटके

भाजपचा हनीमून पिरियड संपला, आता सत्तेचे चटके

राज्यात विरोधी पक्ष म्हणून वावरतांना भाजपाला सत्ताधा-यांवर आरोपांची माळ लावायची सवय होती. मात्र एकामागोमाग झालेल्या आरोपामुळे सत्तेत असलेला भाजप मनातून धास्तावला आहे. भाजपचा हनीमून पिरियड संपला असून आता त्यांना सत्तेचे चटके जाणवायला सुरूवात झालीय. 

डॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच!

डॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच!

 डॉ. संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून निवड करण्यात आल्याचे वाचून (सुखद) आश्चर्याचा धक्काच बसला. धक्का अशासाठी की, गेली अनेक वर्षं विद्यापीठाबद्दल चांगलं असं काही वाचनात येतच नव्हतं. २००५-०६ साली जेव्हा मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या एका प्रकल्पात संयोजक म्हणून काम करत होतो, तेव्हा डॉ. देशमुखांनी प्रबोधिनीतील संशोधन संचालकपद सोडून २ वर्षं झाली होती. तरी वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यातून निर्माण झालेले मैत्रीचे नाती अगदी आजपर्यंतटिकून आहे. हीच गोष्टं त्यांना ओळखणारे अनेक जणं सांगतील – मग त्यात सुमारे ८-१० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर सकाळी ८.०८च्या ठाणे फास्ट लोकलने प्रवास करणारा ग्रुप असो...त्यांचे शाळा किंवा कॉलेजमधील मित्र असोत... विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील त्यांचे सहकारी असोत वा ते संलग्न असलेल्या सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते असोत. जीवनात आपण जसजशी पुढे वाटचाल करतो तशी मागे घट्ट असलेल्या नात्यांच्या गाठी सैल व्हायला लागतात... आपली इच्छा नसून सुद्धा आपण ते टाळू शकत नाही. पण या नियमाला डॉ. देशमुख अपवाद ठरतात.दरवेळेस जेव्हा मी त्यांना भेटायला जातो, तेव्हा त्यांच्यासोबत १०/२०/३० वर्षांपूर्वी काम केलेली वेगवेगळी लोकं भेटतात आणि एवढी जुनी नाती आजही किती घट्ट आहेत याचा प्रत्यय येतो.

हॅलोsss मी तुम्हांला गंडा घालणार आहे...

हॅलोsss मी तुम्हांला गंडा घालणार आहे...

सर, मी सर्व्हिस प्रोव्हाडरकडून बोलते आहे. तुमच्या क्रेडीट कार्डवर आम्ही एक स्पेशल ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्हाला सहा बेनिफिट मिळणार आहे. या सहा बेनिफिटची माहिती मी तुम्हांला देऊ शकते का..

सलमान भेटीनंतर आमीरला 'सत्यमेव जयते'वरून सवाल

सलमान भेटीनंतर आमीरला 'सत्यमेव जयते'वरून सवाल

आमीर खानचा 'सत्यमेव जयते' हा रियालिटी शो चांगलाच गाजला, सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम होता, अनेक सामाजिक विषय  'सत्यमेव जयते'मध्ये हाताळण्यात आले होते. यात दारूचं व्यसन ते रस्ते अपघात असे विषय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले होते.

औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये

औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये

(तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल

आवाज कुणाचा?

आवाज कुणाचा?

( दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई ) लोकसभा निवडणुकीत केंद्रात एक हाती सत्ता आणि त्यानंतर 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतची सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. राज्यातील जनता आता आपल्याबरोबरच आहे असा समज भाजपाला झाला होता.

'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य

'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य

(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबईत घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत इच्छुकांना सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र म्हाडाच्या नावाने एक बनावट वेबसाईट आल्याने, लोकांमध्ये थोडा गोंधळ दिसून येत आहे.

ब्लॉग : 'टॅक्सी'वाल्या ठकसेनांची टोळी...

ब्लॉग : 'टॅक्सी'वाल्या ठकसेनांची टोळी...

दादरमध्ये ठकसेनांची टोळी... खरं वाटत नाही... या ठकसेनानी मलाही गंडा घातला होता... दादर पूर्व येथील टँक्सी स्टॅडवर हे ठकसेन ड्रायव्हर म्हणून काम करतात. 

'नेट न्यूट्रॅलिटी' इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी किती महत्वाची?

'नेट न्यूट्रॅलिटी' इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी किती महत्वाची?

(जयवंत पाटील, झी २४ तास) 'नेट न्यूट्रॅलिटी'वरून देशभरात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. इंटरनेट कॉलिंगसाठी टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळा डाटा चार्ज लावण्यास सुरूवात केली आहे, कंपन्या वेब सर्फिंगमधून जास्त पैसे वसुल करू इच्छीत आहेत, मात्र ट्रायने 'नेट न्यूट्रॅलिटी'वर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. 

कडोंमपा, आहे तिथेच...

कडोंमपा, आहे तिथेच...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आपला मोर्चा नवी मुंबई, औरंगाबाद, अंबरनाथ , बदलापुर वगैरे अशा ठिकाणी प्रचारासाठी वळवतील. 23 एप्रिलला निकाल लागतील. मग त्यांनतर चार महिन्यांत राज्यात त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजेच कडोंमपाची निवडणूक असल्याने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले असेल.

ब्लॉग: किसका साथ किसका विकास ?

ब्लॉग: किसका साथ किसका विकास ?

राज्यात जाचक भूसंपादन कायदा कुणासाठी झाला लागू...

दीपक भातुसे

घुमान डायरी : मुंबई-घुमान-मुंबई

घुमान डायरी : मुंबई-घुमान-मुंबई

घुमानकडे निघालो आहे. घुमान इथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते आहे... 

निसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"

निसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"

 दोन आठवड्यांपूर्वी एका कृषी विषयक कार्यक्रमासाठी औरंगाबादला गेलो होतो. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक बागायतदारांनी शेतात कृत्रिम तळी तयार करून पाणी साठवले. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच शेततळ्यांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले आणि साठवलेले पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे चिंतेत या शेतकरी गढला. गेले चार दिवस निसर्गराजा अवकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर बरसला आणि अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक धुवून गेला. या तडाख्यातून बाहेर यावे तर दोन-चार दिवसांनी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि वर सावधगिरीचा इशाराही दिला आहे. सावध व्हायचे तर नक्की काय करायचे? ज्यांचे पीक वाचले आणि कापणीला आले आहे... त्यांच्या हातात काहीतरी करणे शक्य आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या हाती... आपल्या शेतावर गारपीट होऊ नये अशी प्रार्थना करण्यापलिकडे काही उपाय नाही.

‘प्रभूं’चा संकल्प पूर्ण होणार का?

‘प्रभूं’चा संकल्प पूर्ण होणार का?

रेल्वे बजेटचा भर मागील वर्षांतील अपूर्ण कामं पूर्ण करण्याकडे आहे. त्यासाठी आवश्यक संरचना जसे की आर्थिक-वित्तिय संस्था, जॉइंट व्हेन्चर्स आणि खाजगी क्षेत्राशी भागिदाऱ्या करण्याची तजवीज यात आहे. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर भांडवल, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान उपलब्ध झाले की, सुमारे ७००० किमी लांबीच्या मार्गांचे दुपदरीकरण-चौपदरीकरण करण्याची कामं मार्गी लागू शकतील.

खरे शिवाजी महाराज- परदेशी नजरेतून

खरे शिवाजी महाराज- परदेशी नजरेतून

मराठा साम्राज्याचे जागतिक किर्तीचे इतिहास संशोधक डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांच्या  व्याख्यानासाठी दरबार हॉल भरलेला होता. स्टुअर्ट गॉर्डन म्हणजे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील सेंटर फ़र साऊथ एशियन स्टडीज विभागातले सिनियर रिसर्च स्कॉलर, आशिया आणि जगाच्या इतिहासावरची त्यांची पुस्तके जगभर गाजली.