Aurangabad and Marathwada News

भगवानगड वादाचा नवा अंक, नामदेव शास्त्रींच्या विधानांवर पंकजांचं सूचक मौन

भगवानगड वादाचा नवा अंक, नामदेव शास्त्रींच्या विधानांवर पंकजांचं सूचक मौन

भगवानगड वादाप्रकरणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली माघार म्हणजे त्यांची राजकीय खेळी असल्याचे विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. गडाच्या विकासासाठीच आपण गादीवर बसलो असून कीर्तनकाराशिवाय इथं कोणाचाच आवाज निघणार नाही असंही नामदेवशास्त्री यांनी ठणकावलं आहे.

झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर सुट्टीच्या दिवशीही तुरीचे पंचनामे

झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर सुट्टीच्या दिवशीही तुरीचे पंचनामे

झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर आता प्रत्यक्षात तुरीच्या पंचनाम्यास सुरूवात झाली आ्हे. सुट्टीच्या दिवशीही पंचनामे केले जावेत यासाठी झी 24 तासने पाठपुरावा केला. त्यानंतर पणनमंत्र्यांनी सुट्टीच्या दिवशीही पंचनामे करण्याचे आदेश दिले. आता प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे.

गरोदर मातेला वॉर्ड बाहेर काढल्याने रुग्णालय आवारात उघडयावर प्रसूती

गरोदर मातेला वॉर्ड बाहेर काढल्याने रुग्णालय आवारात उघडयावर प्रसूती

उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातेलाही त्यांच्या नातेवाईकांसोबत वॉर्ड बाहेर काढल्याने त्या महिलेची रुग्णालयाच्या आवारात, उघडयावर प्रसूती झाली.  

मुंबई-लातूर एक्स्प्रेस आता बिदरपर्यंत धावणार, नवा वाद

मुंबई-लातूर एक्स्प्रेस आता बिदरपर्यंत धावणार, नवा वाद

मुंबई-लातूर एक्स्प्रेस आता बिदरपर्यंत धावणार असल्यामुळे लातूरकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर उदगीरकर आनंदात आहेत. 

उकळत्या पाण्यात पडून चिमुरड्याचा मृत्यु

उकळत्या पाण्यात पडून चिमुरड्याचा मृत्यु

औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

कर्जाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्यानं संपवली जीवनयात्रा

कर्जाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्यानं संपवली जीवनयात्रा

परभणीत आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय. थकलेल्या कर्जाला कंटाळून कैलास आकात या ३५ वर्षीय अल्प भू-धारकानं आपलं जीवन संपवलंय.

धुळ्यात उष्माघाताचा दुसरा बळी

धुळ्यात उष्माघाताचा दुसरा बळी

धुळे जिल्ह्यात उष्माघातानं दुसरा बळी घेतलाय. धनुरमधील शेतकरी अशोक पितांबर पाटील यांचा उष्माघाताने उपचारादम्यान मृत्यु झाला. 

शेतकऱ्यांकडून आशेने भाव नसलेल्या तुरीची राखण

शेतकऱ्यांकडून आशेने भाव नसलेल्या तुरीची राखण

विशेष म्हणजे तूर विकण्यासाठी २२ एप्रिल पूर्वीपासूनच अनेक शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ताटकळत बसून आहेत. 

शिकवणीचे पैसे न भरल्याने चक्क विद्यार्थ्यांला कोंडले

शिकवणीचे पैसे न भरल्याने चक्क विद्यार्थ्यांला कोंडले

एकेकाळी शिक्षणाच्या विशेष पॅटर्नसाठी प्रसिद्ध असणारं लातूर हळूहळू खासगी शिकवण्याच्या विळख्यात पुरतं अडकून गेलंय. आणि याच शिकवण्यांचे पैसे भरताना पालक हैराण झालेत. लातूरमध्ये अशाच एका शिक्षिकेनं फिचे पाचशे रुपये थकवल्याने मुलाच्या पालकांचा जीव कसा टांगणीला लावला. हा स्पेशल रिपोर्ट

शेतकरी चार दिवसांपासून तूर विक्रीसाठी ताटकळत

शेतकरी चार दिवसांपासून तूर विक्रीसाठी ताटकळत

 सरकारच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी झालेलीच नाही. सरकारकडून आदेश नसल्याने तूर खरेदी रखडली आहे. खरेदी केंद्रांसमोर शेतकरी अजूनही रांगेतच उभा आहे. तूर उत्पादक शेतक-यांना सरकार दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित करुन ४ दिवसांपासून शेतकरी तूर विक्रीसाठी ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे.

धनंजय मुंडे यांची तूर खरेदी केंद्रास भेट

धनंजय मुंडे यांची तूर खरेदी केंद्रास भेट

 बीड जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रास भेट दिली, त्यांनी यावेळी थेट शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. 

तूर खरेदी बंद केल्यानं जालन्यात शेतकरी संतप्त

तूर खरेदी बंद केल्यानं जालन्यात शेतकरी संतप्त

नाफेडनं शेतक-यांची तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी चांगलाच संतप्त झालाय. जालन्यातील संतप्त शेतक-यांनी तूर खरेदी बंद झाल्यानं घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरीमध्ये अंबड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते.

लेखक शरद पवार औरंगाबादेत म्हणाले...

लेखक शरद पवार औरंगाबादेत म्हणाले...

मी अनुभव लिहिले आणि पुरस्कार मिळाला,  खूप काही लिहायचं आहे. मात्र राजकारणातील माझे हितचिंतक मला आता तुम्ही हेच करा असं म्हणतील.

तूर खरेदी केंद्रावर गेल्या शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडून पाय फ्रॅक्चर

तूर खरेदी केंद्रावर गेल्या शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडून पाय फ्रॅक्चर

राज्यात तूर खरेदी  केंद्र बंद झाल्याचा सगळ्यात मोठा फटका औरंगाबादमधल्या पैठणच्या  रंगनाथ आल्हाट या 75 वर्षाच्या शेतक-याला बसलाय..... 

भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा

भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा

 भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा झालीय. मानवत तालुक्यातील राजुरा येथील ही घटना. 30 जणांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्या 30 जणांमध्ये 22 लहान मुलामुलींचा समावेश आहे. परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. सप्ताहमध्ये शनिवारी सकाळी या सर्वांनी पोहे खाल्ले होते. 

ओवेसींच्या दोन सभेनंतरही एमआयएमचं लातूरमध्ये पानिपत

ओवेसींच्या दोन सभेनंतरही एमआयएमचं लातूरमध्ये पानिपत

लातूर महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची करूनही एमआयएमला भोपळाही फोडता आलेला नाही.

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.

परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.

परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी

परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी

परभणी महापालिकेच्या निवडणूक निकालात काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक निकालात 31 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 ठिकाणी आघाडीवर आहे. शिवसेना आणि भाजपनं प्रत्येकी सात जागांवर आघाडी घेतली आहे. परभणीत एकूण 65 जागांसाठी मतदान झालं होतं.

शून्यातून भाजप सत्तेत, अभिनेता रितेशचा प्रचार तरीही काँग्रेस फ्लॉप

शून्यातून भाजप सत्तेत, अभिनेता रितेशचा प्रचार तरीही काँग्रेस फ्लॉप

गतवर्षी येथे भाजपची एकही जागा नव्हती. त्यामुळे शून्यातून सत्तेत भाजप बसला आहे. तर दुसरीकडे स्टार प्रचारक म्हणून अभिनेता रितेश देशमुख प्रचारात उतरला होता. मात्र, याचा प्रभाव मतदारांवर पडलेला नाही.  

लातुरात देशमुख गड ढासळला, भाजपची मुसंडी

लातुरात देशमुख गड ढासळला, भाजपची मुसंडी

 अमित देशमुख यांना काँग्रेसचा लातूर गड कायम राखण्यात अपयश आले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा धुव्वा उडवलाय.