Aurangabad and Marathwada News

औरंगाबादला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

औरंगाबादला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

जायकवाडी धरणातून औरंगाबाद महानगर पालिकेला पाणी पुरवठा करणारी 700 एमएमची जलवाहिनी अचानक फुटली आहे.

शिवप्रहार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला

शिवप्रहार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला

शिव प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव भोर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. 

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंचा शिवसेनेला जोरदार टोला, शरद पवारांवर टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंचा शिवसेनेला जोरदार टोला, शरद पवारांवर टीका

राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 'इथं सिंहाचा उंदीर आणि उंदराचा सिंह व्हायला वेळ लागत नाही' असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. 

दाभाडी इथे अज्ञाताने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी

दाभाडी इथे अज्ञाताने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी

बदनापूर तालुक्यातील दाभाडी इथे अज्ञाताने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. शमीम मिर्झा असं या जखमी हॉटेलचालकाचं नाव आहे.

महाराष्ट्राची 'समृद्धी' वाढली! वाघिणीचा तीन बछड्यांना जन्म

महाराष्ट्राची 'समृद्धी' वाढली! वाघिणीचा तीन बछड्यांना जन्म

औरंगाबादच्या सिद्दार्थ प्राणीसंग्रहालयात तीन नव्या चिमुकल्या पाहूण्यांचं आगमन झालं आहे.

औरंगाबादमधील पेट्रोल पंप बंद, पालिका कारवाई बडग्यानंतर आंदोलन

औरंगाबादमधील पेट्रोल पंप बंद, पालिका कारवाई बडग्यानंतर आंदोलन

शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या कारवाई विरोधात हा एक दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे.

मराठा समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू : मराठा मोर्चा संयोजन समिती

मराठा समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू : मराठा मोर्चा संयोजन समिती

मराठा मोर्च्याच्या धाकाने काही राजकीय मंडळी समाजात फूट पाडू पाहत आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने केला आहे. मराठा समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा देखील संयोजन समितीने औरंगाबादेत दिला. 

वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या

वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या

वडिलांनी एटीएममधून पैसे काढून न दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

औरंगाबादकरांना पासपोर्ट पोस्ट ऑफिसात मिळणार

औरंगाबादकरांना पासपोर्ट पोस्ट ऑफिसात मिळणार

पासपोर्टसाठी औरंगाबादकरांना मुंबईत मारावे लागणारे खेटे आता बंद होणार आहेत.

 लातुरात मुस्लिम समाजाच्यावतीने भव्य मूकमोर्चा

लातुरात मुस्लिम समाजाच्यावतीने भव्य मूकमोर्चा

मराठा, दलित-ओबीसी मोर्चानंतर आज लातूर शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. 

आई-वडिलांनी तिला कचरा-कुंडीत टाकलं?

आई-वडिलांनी तिला कचरा-कुंडीत टाकलं?

घरात गरीबी, पहिली मुलगी, दुसरा मुलगा पण गतीमंद, मुलासाठी तिसरा चान्स घेतला. पण तिसरं बाळ कचराकुंडीत फेकलं. कारण ती मुलगी होती. गरीबीत दुसरी मुलगी कशी पोसायची, पण तिच्या जागी जर मुलगा झाला असता तर, मग गरीबीचा मुद्दा गौण ठरला असता का?...

6 लाखाच्या नोटा बदलून दिल्याने कॅशिअर निलंबित

6 लाखाच्या नोटा बदलून दिल्याने कॅशिअर निलंबित

6 लाखाच्या 1 हजार आणि 500 च्या जुन्या नोटा बदलून दिल्याने कॅशिअर निलंबित करण्यात आले आहे. औंढा नागनाथ शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत हा प्रकार घडला.

नांदेडमध्ये जाळला शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा

नांदेडमध्ये जाळला शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा

 पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात नांदेडचा वीर जवान शहीद झाल्यानंतर नांदेडमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला... 

नोटाबंदीच्या काळातही सापडतायत लाचखोर

नोटाबंदीच्या काळातही सापडतायत लाचखोर

 तीन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सविता चौधरच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली आहे.  

मराठवाड्यात राष्ट्रवादीची मुसंडी, परळी राष्ट्रवादीकडे

मराठवाड्यात राष्ट्रवादीची मुसंडी, परळी राष्ट्रवादीकडे

मराठवाड्यातल्या निवडणुकांकडे सगळ्या राज्याचंच लक्ष लागलं होतं. त्यामध्येही महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे, बीडमधल्या परळीच्या निकालाबाबत सा-यांनाच उत्सुकता होती. परळीसह एकंदर मराठवाड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसनं मुसंडी मारलेली पाहायला मिळतेय. 

परळीत मुंडे विरुद्ध मुंडे लढाईत धनंजय मुंडेची बाजी

परळीत मुंडे विरुद्ध मुंडे लढाईत धनंजय मुंडेची बाजी

राज्यात प्रतिष्ठेची असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणूकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही थेट प्रतिष्ठेची लढाई होती. पण पंकजा मुंडे यांना परळी पालिकेच्या निवडणूकीत धक्का बसला आहे. ३३ पैकी २७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ४ जागांवर भाजपचे आणि सेना, काँग्रेसचे एक-एक उमेदवार आघाडीवर आहेत.

नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर

नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर

केंद्र सरकारने बंदी आणलेल्या 500 आणि एक हजारांच्या नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर असल्याचे आणखी एका प्रकरणावरून पुढं आलंय. 

गंगाखेडमध्ये निवडणुकीत हाणामारी

गंगाखेडमध्ये निवडणुकीत हाणामारी

परभणी जिल्ह्यातील 7 नगर पालिकांच्या आज निवडणुका सुरू असून सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र गंगाखेड एका ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेंकात भिडले. 

जालन्यात भीषण अपघात 4 ठार 5 जखमी..

जालन्यात भीषण अपघात 4 ठार 5 जखमी..

जालना जिल्ह्यातील भोकरदन-सिल्लोड रोडवर मुठाळ पाटीजवळ झालेल्या अपघात 4 ठार तर 5 जण जखमी झालेत.. 

 पोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं

पोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं

केंद्रीय पोस्ट कार्यालयाने शुक्रवारी देशातील तब्बल पाचशेपेक्षा अधिक कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता अचानक कामावरून काढून टाकले.

'उमेदवार विजयी केलात तर निधी कमी पडू देणार नाही'

'उमेदवार विजयी केलात तर निधी कमी पडू देणार नाही'

नगरपालिका निवडणुकीतील प्रचाराचा जोर आता अधिकच वाढलाय.