सुरक्षारक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक बलात्कार

सुरक्षारक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक बलात्कार

ठाणे महानगर पालिकेच्या इयत्ता पाचवीत  शिकणाऱ्या १० वर्षीय २ अल्पवयीन मुलीना सुरक्षारक्षकांने अश्लिल चित्रफित दाखवून अनैसर्गिक बलात्कार करण्याचा प्रयत्न धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

डोंबिवलीकरांनी अनुभवला गोविंदाचा धिंगाणा डोंबिवलीकरांनी अनुभवला गोविंदाचा धिंगाणा

बेभान होऊन दहीहंडीसाठी गावभर फिरणा-या गोविंदांच्या दादागिरीचा अनुभव डोंबिवलीतल्या नागरिकांना आला. शहरभर नुसता धिंगाणा आणि गोंगाट घालत फिरणा-या गोविंदा पथकातल्या युवकांना रस्ता म्हणजे केवळ आपली जहागिरी असं वाटत होतं. याचा फटका केडीएमटीच्या बसमधल्या प्रवाशांनाही बसला.

रत्नागिरीत नदीत दहीहंडी रत्नागिरीत नदीत दहीहंडी

जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गिम्हवी गावात दरवर्षी आगळीवेगळ्या पद्धतीनं दहीहंडी उत्सव साजरा होतो. नदीत दहीहंडी बांधली जाते आणि गावातले गोविंदा ही हंडी फोडण्यासाठी येतात.

डोंबिवलीत डॉक्टर, सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण डोंबिवलीत डॉक्टर, सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

शहरातील महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात एका रूग्णाच्या मित्रांनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकालाही बेदम चोपले.

दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी वाटली मिठाई दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी वाटली मिठाई

दहीहंडी म्हटले की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतूककोंडी हे ओघाने आले. ज्या परिसरात ही दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो. मात्र, दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

ठाण्यात मनसे आयोजक, जय जवान पथकावर गुन्हा दाखल ठाण्यात मनसे आयोजक, जय जवान पथकावर गुन्हा दाखल

जय जवान पथक आणि अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली.

पोलिसांनी ताकीद दिल्यानंतर मनसेची हंडी झुकली पोलिसांनी ताकीद दिल्यानंतर मनसेची हंडी झुकली

मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन झालं. जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली. तर आम्ही कोपरीकर या मंडळाने आठ थर लावले. यामध्ये सर्वात शेवटच्या थराला बालगोविंदाचा समावेश होता.

मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन

 मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन झालं. जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली. तर आम्ही कोपरीकर या मंडळाने आठ थर लावले. यामध्ये सर्वात शेवटच्या थराला बालगोविंदाचा समावेश होता.

मनसेची ठाण्यातील दहीहंडी वादात, वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवलं मनसेची ठाण्यातील दहीहंडी वादात, वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवलं

ठाणे भगवती मैदानातील मनसेची दहीहंडी वादात अडकली आहे 

उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेची तोडफोड

नगरविकासाची कामं ठप्प झाल्याचा आरोप करत महापालिकेच्या मुख्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली. शिवसेनेचं शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी शिवसैनिकांना सुरक्षारक्षकांनी रोखलं. याचा निषेध करत शिवसैनिकांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड केली.

मुलीचा सौदा करणाऱ्या आईला अटक मुलीचा सौदा करणाऱ्या आईला अटक

पोटच्या मुलीचा सौदा करणाऱ्या एका निर्दयी आईला पोलिसांनी अटक केली आहे. देहविक्रीसाठी या मुलीची विक्री केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

रत्नागिरीत रेल्वे संशोधन केंद्राचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरीत रेल्वे संशोधन केंद्राचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 रत्नागिरीच्या मुंबई उपकेंद्रात, रेल्वे संशोधन केंद्राचं उदघाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं.  देशामध्ये रेल्वेला फायदा व्हावा यासाठी रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे आणि त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत एक करार करण्यात आला होता. त्याचाच एक पाऊल म्हणून या केंद्राचं उदघाटन  करण्यात आलंय.

पालघरमध्ये पंधरा मच्छिमार सूखरूप बचावले पालघरमध्ये पंधरा मच्छिमार सूखरूप बचावले

 तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील पंधरा मच्छिमार सूखरूप बचावलेत. तराफाच्या मदतीनं खवललेल्या समुद्रातून हे पंधरा जण साडे चार किलोमीटर अंतर पोहून उंबरगाव येथील वृदावन परिसरातील किना-यावर साडे तीन वाजता पोहोचले.

महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले

सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत दोन एसटी आणि काही कार वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 32 वर पोहोचलाय. आज आणखी दोन मृतदेह सापडले.

पनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा पनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा

गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत. 

शाळेमागे नग्नावस्थेत सापडलेल्या तरूणींच्या हत्येचा लागला छडा शाळेमागे नग्नावस्थेत सापडलेल्या तरूणींच्या हत्येचा लागला छडा

वसईत शाळेच्या आवारात  सापडलेल्या अल्पवयीन  मुलीच्या हत्येचा  छडा अखेर पोलिसांनी लावला आहे. ३  जुलैला वसईच्या विद्याविकासनि शाळेच्या आवारात एका मुलोचा मृतदेह  नग्न अवस्थेत आढळला होता. 

उरण येथे नौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग उरण येथे नौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

रायगड जिल्ह्यातील उरण येथे नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी मारहाण : आमदार सुरेश लाड यांना अटक होणार उपजिल्हाधिकारी मारहाण : आमदार सुरेश लाड यांना अटक होणार

 मारहाण प्रकरणी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाड यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण, चौपदरीकरणाचे काम रखडले मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण, चौपदरीकरणाचे काम रखडले

गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्याचं काम गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे.

रत्नागिरीत मासेमारी नौका बुडाली, 8 जणांना वाचविण्यात यश रत्नागिरीत मासेमारी नौका बुडाली, 8 जणांना वाचविण्यात यश

मिरकरवाडा येथे मासेमारी नौका उलटली आणि बुडाली. मात्र, 8 जणांना वाचविण्यात यश आले आहे.

पाय घसरल्याने युवक दरीत कोसळला पाय घसरल्याने युवक दरीत कोसळला

आंबोली घाटात चंदगडमधील युवक पाय घसरून पडला. ही दुर्घटना सायंकाळी सव्वासातला घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. या युवकाचं नाव पवन चौगुले असल्याचं सांगण्यात येत आहे.