Thane and Kokan News

टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. 

कल्याण, डोंबिवलीमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार

कल्याण, डोंबिवलीमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार

राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचं चित्र आहे. मुंबई वगळता सर्वच महत्त्वाच्या शहरात पाऱ्याने चाळीशीचा पल्ला गाठल्याचं दिसून येतंय. पुणे नाशिक नागपूरमध्ये पाऱ्याने चाळीशी गाठलीय. तर ठाण्यातही तापमान 39 अंशांवर पोहोचलं. 

अबब! 700 किलो वजनाचा मासा

अबब! 700 किलो वजनाचा मासा

विजयदुर्ग समुद्रात मच्छीमारी करत असताना मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात तब्बल ७०० किलो वजनाचा आणि २० फुट लांबीचा नालिया जातीचा भला मोठा मासा सापडला.

कल्याण डोंबिवली पालिका आवारात हॉकीस्टिक, स्टम्प कशासाठी?

कल्याण डोंबिवली पालिका आवारात हॉकीस्टिक, स्टम्प कशासाठी?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शनिवारी सर्वसाधारण सभा सुरु असताना पालिका आवारात झालेल्या राडा प्रकरणी, पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.

पेंढारकर कॉलेजच्या व्यवस्थापनाविरोधात साखळी उपोषण

पेंढारकर कॉलेजच्या व्यवस्थापनाविरोधात साखळी उपोषण

व्यवस्थापन मंडळ हे बेकायदेशीर आणि स्वयंघोषित असल्याचा अहवाल मुंबई विद्यापीठानं दिला आहे.

कोकणातला शेतकरीही सावकाराच्या पाशात...

कोकणातला शेतकरीही सावकाराच्या पाशात...

विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.

कोकणातील शेतकरी, मच्छिमार सावकारी पाशात

कोकणातील शेतकरी, मच्छिमार सावकारी पाशात

विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय. 

पोलीस भरतीत पहिल्यांदाच बायोमेट्रिकचा वापर

पोलीस भरतीत पहिल्यांदाच बायोमेट्रिकचा वापर

रत्नागिरीमध्ये रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांसाठी भरती सध्या सुरू आहे. रत्नागिरीतल्या शिवाजी स्टेडियम आणि पोलीस परेड ग्राऊंडवर या भरतीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असून उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्याचं काम सुरूय. 

रत्नागिरीत अट्टल घरफोड्या गजाआड

रत्नागिरीत अट्टल घरफोड्या गजाआड

 नवी मुंबई, रत्नागिरी आणि सांगली पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा परशुराम शेडगे. त्याच्या चो-यांच्या कारनाम्यामुळे पोलीस चांगलेच चक्रावून गेलेत. रत्नागिरी, गुहागर, चिपळूणमध्ये घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं. चोरांना जेरबंद करण्यासाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कसून शोध सुरू होता. या तपासात परशुराम शेडगेवरही पोलिसांचं लक्ष होतं.

संतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल

संतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल

शनिवारी सकाळपासून कामावर रुजू होण्याच संपकरी निवासी डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी यामुळे नाहक त्रास सोसावा लागल्यानं रुग्णांचा पारा चढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. 

डोंबिवलीत भरदिवसा आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

डोंबिवलीत भरदिवसा आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

आरटीआय कार्यकर्ते आणि निर्भय बनो संघटनेचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांच्यावर बुधवारी भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला. 

बदलापुरातल्या त्या खुनाचं गूढ उकललं

बदलापुरातल्या त्या खुनाचं गूढ उकललं

१५ मार्च रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत जगत साही याचा मृतदेह शीर वेगळे केलेल्या छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. 

रिलायन्स विरोधात ठाणे महापालिकेचे जप्तीचे वॉरंट

रिलायन्स विरोधात ठाणे महापालिकेचे जप्तीचे वॉरंट

ठाणे महापालिका क्षेत्रातील रिलायन्स कंपनीने उभारलेल्या मोबाईल टॉवर्सचा सुमारे 22 कोटी रूपयांचा थकीत मालमत्ता कर तात्काळ भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देवूनही  तो न भरल्याने महापालिकेने कंपनीच्या विरोधात जप्ती वॉरंट काढले आहे. 

निलेश राणेंचा राजीनामा

निलेश राणेंचा राजीनामा

माजी मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रसेचे माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

उल्हासनगरमधील भाजलेल्या वडापाव दुकान चालकाचा मृत्यू

उल्हासनगरमधील भाजलेल्या वडापाव दुकान चालकाचा मृत्यू

उल्हासनगरमधील वडापाव दुकानमालक चंदरलाल रामरखियानी यांचा मृत्य, शंभर टक्के भाजलेले चंदरलाल रामरखियानी याचा उपचारादरम्यान झाला मृत्यू 

वडा पाव विक्रेत्यानं दुसऱ्या वडा पाव विक्रेत्याला जाळलं

वडा पाव विक्रेत्यानं दुसऱ्या वडा पाव विक्रेत्याला जाळलं

व्यावसायिक वादातून एका वडापाव विक्रेत्याने दुसऱ्या वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. 

कुत्र्यावरून गाडी चालवणारा सीसीटीव्हीत कैद

कुत्र्यावरून गाडी चालवणारा सीसीटीव्हीत कैद

 ठाण्यातील वर्तकनगर भागात एका भटक्या कुत्र्याला गाडीखाली चिरडून मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

पनवेलमध्ये घर घेणाऱ्या २०० जणांची बिल्डरकडून कोट्यवधींना फसवणूक

पनवेलमध्ये घर घेणाऱ्या २०० जणांची बिल्डरकडून कोट्यवधींना फसवणूक

  पनवेलमध्ये घराच्या बहाण्याने 200 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. 

आज जागतिक चिमणी दिवस

आज जागतिक चिमणी दिवस

आज जागतिक चिमणी दिवस आहे, २० मार्च हा दिवस आज जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. 

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट, ग्रुप सदस्याला अटक

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट, ग्रुप सदस्याला अटक

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं एका ग्रुपच्या सदस्याला पोलीस कोठडीत जावं लागल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय. 

खोपोली बोरघाटात मिनी बसला अपघात

खोपोली बोरघाटात मिनी बसला अपघात

रायगड जिल्ह्यातल्या खोपोली बोरघाटात मिनी बसला अपघात झाला. या अपघातात केवळ एका झाडामुळे भीषण दुर्घटना टळली.