राऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 09:25

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

वाशी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विजयी, पालघर पालिकेकडे लक्ष

Last Updated: Sunday, March 23, 2014, 23:42

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्रमांक 48 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी रमेश शिंदे यांचा दविजय झाला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शिंदे यांचा 290 मतांनी पराभव केला. तर पालघर नगरपरिषदेसाठी आज 74 टक्के मतदान झालं.

`त्या` कामाला नकार दिल्यानं तिच्यावर अमानुष अत्याचार

Last Updated: Monday, March 24, 2014, 09:28

अतिशय अमानुष अशी घटना भिवंडीत घडलीय. वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यानं तरूणीवर अमानुष कृत्य करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केलीय. तर दोघं फरार झालेत.

उद्धव ठाकरे बरसले; पवार, राज यांच्यावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे बरसले; पवार, राज यांच्यावर हल्लाबोल

Last Updated: Saturday, March 22, 2014, 17:21

शिवसेना हा ओरिजिनल म्हणजेच नवनिर्मित पक्ष आहे. तर राष्ट्रवादी हा विकाऊ आणि गद्दारांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कुठे काय मिळते काय, यावर त्यांचा डोळा असतो, अशी जोरदार टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई येथे केली. याचवेऴी शिवसेना-भाजप युती सर्व जागा जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला.

रत्नागिरी : २५१  प्राथमिक शाळांचं वीज कनेक्शन तोडलं

रत्नागिरी : २५१ प्राथमिक शाळांचं वीज कनेक्शन तोडलं

Last Updated: Thursday, March 20, 2014, 23:48

रत्नागिरी जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्रयांवर वीज कनेक्शन तोडण्याची महावितरणने अवलंबिलेल्या कारवाईमध्ये जिल्हा परिषदेच्या २५१ प्राथमिक शाळांना फटका बसला आहे.

बदलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 17:37

बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यामुळे बदलापूरमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, या गोळीबाराचा निषेध म्हणून मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या कपिल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश!

राष्ट्रवादीच्या कपिल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश!

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 16:10

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत भाजपनं भिवंडीचे शहरप्रमुख आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय.

ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

Last Updated: Sunday, March 16, 2014, 14:26

ठाण्यातल्या समतानगरमध्ये सुंदरबन पार्क या इमारतीला भीषण आग लागलीय. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागलीय. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून इमारतीत काहीजण अडकले आहे.

पुण्यातील तरुणाचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 08:58

पुण्यातील तरुणाचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू

ट्रकने उडालेला दगडाने घेतला टॅक्सीतील प्रवाशाचा जीव

Last Updated: Sunday, March 16, 2014, 08:52

मुंबई - पुणे महामार्गावर कामोठे ते तुर्भे दरम्यान रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान, रस्त्यावर अनेक दगड पडलेले असून रस्त्यावरील एक दगड ट्रकने उडाल्याने चालत्या टॅक्सीवरील काचेवर आदळला. दगडाने काच तुटली आणि टॅक्सीतील प्रवाशाला लागला. या अपघातात प्रवाशी जागीच ठार झाला.