Thane and Kokan News

रत्नागिरीत शिवसेना स्वबळावर, पारदर्शकतेवरुन हल्लाबोल

रत्नागिरीत शिवसेना स्वबळावर, पारदर्शकतेवरुन हल्लाबोल

जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली.

गुहागर एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक कामबंद आंदोलन

गुहागर एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक कामबंद आंदोलन

जिल्ह्यातल्या गुहागर एसटी आगारातल्या कर्मचा-यांची आज अचानक कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

ठाणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...

ठाणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...

ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. 

 आधारवाडी जेल झालंय ओव्हरफ्लो...

आधारवाडी जेल झालंय ओव्हरफ्लो...

आधारवाडी जेलमध्यै कैदी पाठवू नका असं फर्मान कल्याण सत्र न्यायालयाने काढलंय. राज्यातील कारागृहात कैद्यांची संख्या इतकी झालीये की आता कारागृहात कैदी घेतले जाणार नाहीत असे फर्मानच कारागृह प्रशासनाने काढलय. त्यामुळे आता कैदी ठेवायचे कुठे असा प्रश्न पोलिसांना आणि कारागृह प्रशासनाला पडलाय.

ठाण्यात निवडणुकीआधी राष्ट्रवादीला धक्का

ठाण्यात निवडणुकीआधी राष्ट्रवादीला धक्का

ठाण्यातले राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक आणि १ माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे. विरोधी पक्षनेते संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, स्थानिक नगरसेवक उषा भोईर आणि माजी नगरसेवक रविंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक

दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक

दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

'अविवाहित राहाल तरच यशस्वी व्हाल'

'अविवाहित राहाल तरच यशस्वी व्हाल'

अविवाहित राहिलात तरच यशस्वी व्हाल असा अजब सल्ला योगगुरू बाबा रामदेव यांनी दिला आहे.

खेडची हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक असणारी यात्रा

खेडची हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक असणारी यात्रा

खेड तालुक्यातील सुखदरची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक.. दोन दिवस ही यात्रा दिवस रात्र सुरू असते... यात्रेत पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा पहायला मिळते...पाहूयात कशी असते ही यात्रा...

रेल रोको केलेल्या २०० जणांवर गुन्हा दाखल

रेल रोको केलेल्या २०० जणांवर गुन्हा दाखल

कोपर - डोंबिवली स्टेशन दरम्यान रेल रोको केलेल्या २०० जणांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

अंकिता राणेला निवडणूक रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी

अंकिता राणेला निवडणूक रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी

निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकारणातली ती कामाला लागली आहे. ठाण्यातील अंकिता राणेला रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी केली आहे.  

भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा

भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा

भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा देण्यात आला आहे. सत्तेत कुणीही वाटेकरी नको असं विधान भाजप नेते मधु चव्हाण यांनी केलं आहे. सारा महाराष्ट्र जिंकूया अर्धा नाही असंही चव्हाण यांनी म्हटलंय.

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने रेल रोको

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने रेल रोको

डोंबिवली रेल्वे रुळ लगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याने येथील लोकांनी रेलरोको केला आहे.

ठाण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक

ठाण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक

राज्यात महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ठाण्यामधील राज्य कार्यकारिणीची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीआधी युतीला विरोध करणारी पोस्टर लावण्यात आली आहेत. त्यामुळे बैठकीत येणा-या निवडणुकांमध्ये होणा-या युतीबाबत पदाधिका-यांचा काय सूर उमटतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

रक्तचंदनावरून राजकीय वातावरण तापलं, जाधव-कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप

रक्तचंदनावरून राजकीय वातावरण तापलं, जाधव-कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप

चिपळुणात रक्तचंदनावरून राजकारण पेटू लागले आहे. काल भास्कर जाधव यांनी नाव न घेता रमेश कदम याना टोला मारला होता.

कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला बुरे दिन?

कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला बुरे दिन?

निवडूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कोकणातदेखील तीन जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे.

रत्नागिरीत सापडला भुयारी मार्ग आणि गुहा

रत्नागिरीत सापडला भुयारी मार्ग आणि गुहा

रत्नागिरी शहरापासून काही किलोमीटर अंतरावर पावसपासून जवळच असलेल्या शिवार आंबेरे ते नाखरे गाव असा सुमारे 10 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग सापडला आहे. 

नवी मुंबईतील मेट्रोचा पहिला रेक दाखल

नवी मुंबईतील मेट्रोचा पहिला रेक दाखल

2011मध्ये या मेट्रोचं काम सुरू झालं. बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे. 

रत्नागिरीतील रक्तचंदन तस्करी प्रकरणात संशयाची सुई अधिक गडद

रत्नागिरीतील रक्तचंदन तस्करी प्रकरणात संशयाची सुई अधिक गडद

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10  कोटीहून अधिक रक्कम असलेल्या चिपळूणच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणात आता संशयाचं धुकं दाटू लागले आहे.  

 खारेगाव फाटकावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचं काम सुरू

खारेगाव फाटकावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचं काम सुरू

कळवा, खरेगाव आणि डोंगरावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांचे तसंच रहिवाशांचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो बळी घेणाऱ्या खारेगाव रेल्वे फाटकावर रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

नवी मुंबईत प्लास्टिक बंदी अभियानाला सुरुवात

नवी मुंबईत प्लास्टिक बंदी अभियानाला सुरुवात

रस्त्यावर फेकण्यात आलेले प्लास्टिक उचलून नागरिकांना प्लास्टिकमुक्तीचा संदेशही यावेळी देण्यात आला.