चिखल उडाले म्हणून मुलावर प्राणघातक हल्ला

चिखल उडाले म्हणून मुलावर प्राणघातक हल्ला

दुचाकीने चिखल उडाले म्हणून तिघा भावांनी एका १७ वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या गोळीबार चौकात ही घटना घडली असून कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना फक्त, चिखल उडाले या अतिशय शुल्लक कारणाकरता हा हल्ला केला. या याप्रकरणातील आरोपींना तहसील पोलिसांनी अटक केली आहे.

हिंगोलीतील सिंदगी गाव परिसरात ढगफूटी हिंगोलीतील सिंदगी गाव परिसरात ढगफूटी

कळमनुरी तालुक्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. सिंदगी गाव परिसरात ढगफूटी झाली. यामध्ये गावातल्या अनेक घरांचं अतोनात नुकसान झालं आहे. होतेवारंगा डोंगरकडा, दांडेगाव, रेडगाव परीसरात तासभर मुसळधार पाऊस झाल्यानं, नद्यानाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागलेत. कयादू नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलंय. अशाच अलोट पाण्याच्या प्रवाहात एकाचा मृतदेह वाहून गेला. दरम्यान कळमनूरी तालुक्यातल्या सालापूर आणि जवळा पांचाल नदीला पूर आल्यानं रेडगावचा संपर्क तुटलाय. 

शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार

यवतमाळ पब्लिक स्कूल शाळेतल्या १० ते १२ विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करण्यात आल्याचं उघड झालंय. 

लग्नानंतर चार मुली झाल्यात मुलगा होत नसल्याने मुलीसह पत्नीला मारहाण करत काढले घराबाहेर लग्नानंतर चार मुली झाल्यात मुलगा होत नसल्याने मुलीसह पत्नीला मारहाण करत काढले घराबाहेर

धक्कादायक बातमी. लग्नानंतर चार मुली झाल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करत मुलींसह तिला घराबाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार घडला. यवतमाळच्या पुसद तालुक्यामधल्या वडद गावात ही घटना घडली आहे.

खळबळजनक, एकाच  घरातील सहा जणांची आत्महत्या खळबळजनक, एकाच घरातील सहा जणांची आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आज दुपारी एकाच कुटुंबातील ६ जणांनी सामूहिक आत्महत्यांची केल्याची घटना उघडीस आली या घटनेने  मुले संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या गुंडांकडून कार्यालयावर दगडफेक : भाजप आमदार शिवसेनेच्या गुंडांकडून कार्यालयावर दगडफेक : भाजप आमदार

येथील महागाव इथे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयावर झालेली दगडफेक ही शिवसेनेच्या गुंडांकडून झाल्याचा घणाघाती आरोप आमदारांनी केला आहे.

...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो! ...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो!

नळातून दूषित पाणी येतं आपण ऐकलं असेल मात्र नळातून साप आला तर...  

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बसवर चाप शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बसवर चाप

व्यावसायिक स्पर्धेपोटी शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणा-या स्कूल बसवर चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे स्कूलबसेसची तपासणी केली जातेय. स्कूल बस चालवताना नियमांचं आणि निकषांचं उल्लंघऩ होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आरटीओने एकूण 500 बसेसची तपासणी केली

शिवसेना आणि मनसेने इतिहास चाळावा - श्रीहरी अणे शिवसेना आणि मनसेने इतिहास चाळावा - श्रीहरी अणे

विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक राज्याचे माजी महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढविला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळात गुजरात, तमिळनाडू, ओडिशापर्यंत मराठ्यांचे राज्य होते, असे  अणेंनी म्हटले आहे.

नोकरी देण्याचे खोटे रॅकेट : शिक्षिकेचा हात, फसलेल्या युवकाची आत्महत्या नोकरी देण्याचे खोटे रॅकेट : शिक्षिकेचा हात, फसलेल्या युवकाची आत्महत्या

जिल्हा परिषदेत नोकरी देण्याचं खोटं आमीष दाखवत अनेकांना फसवल्याचा प्रकार नागपुरात उघड झालाय. या सर्व तरूणांना अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयात नोकरी लावून देण्याचं आमीष एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्या दोन साथीदारांसह दिलं होतं. तिघांना पोलिसांनी अटक केलीय.

त्वचेविना जन्माला आलेल्या नागपुरातल्या 'त्या' बाळाचा मृत्यू त्वचेविना जन्माला आलेल्या नागपुरातल्या 'त्या' बाळाचा मृत्यू

'हर्लेक्विन' नावाचा गंभीर आजार घेऊन जन्म घेतलेल्या त्या बाळाचा जन्मानंतर दोनच दिवसांनंतर मृत्यू झाला... आणि डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. 

गर्भवती महिलेवर पाच दिवस सामूहिक बलात्कार गर्भवती महिलेवर पाच दिवस सामूहिक बलात्कार

भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.

नागपूरात जन्माला आले त्वचा नसलेले बाळ नागपूरात जन्माला आले त्वचा नसलेले बाळ

नागपूरात एक धक्कादायक घटना घडलीये. नागपूरातील लता मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी रात्री एका महिलेने 'जेनेटिक डिसॉर्डर' असलेल्या एका 'हर्लेक्विन' बाळाला जन्म दिला.

तुम्ही पिस्ता खाताय तर सावधान,  रसायनामुळे कॅन्सरचा धोका तुम्ही पिस्ता खाताय तर सावधान, रसायनामुळे कॅन्सरचा धोका

तुम्ही पिस्ता खाताय, तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी. कारण हा पिस्ता तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.

'शेम टू शेम', ६१ विद्यार्थी नापास 'शेम टू शेम', ६१ विद्यार्थी नापास

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या कुसुमतोंडी गावातील फुलचंद भगत महाविद्यालयाचे ६१ विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी 'शेम टू शेम' साऱखं काम केलं आहे.

शहीद प्रमोद मेश्राम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शहीद प्रमोद मेश्राम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुलगावच्या केंद्रीय आयुध भंडाराला लागलेल्या आगीत शहीद झालेल्या यवतमाळच्या प्रमोद ऊर्फ बादल मेश्राम यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे. मेश्राम यांच्या मुळ गावी, पाटीपुरा इथं त्यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. 

उदयोन्मुख धावपटूची विष पिऊन आत्महत्या उदयोन्मुख धावपटूची विष पिऊन आत्महत्या

नागपुरचा गुणवान धावपटू आकाश उके याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. 

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या आरोप या प्राध्यापकावर आहे.

कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नागपूरच्या वाढत्या पाऱ्याने तीन बळी घेतलेत. चढत्या तापमानापासून बचाव करण्याकरिता घरात लावलेल्या कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. 

नागपूर सूरत महामार्गावरील अपघातात २ ठार नागपूर सूरत महामार्गावरील अपघातात २ ठार

नागपूर सूरत महामार्गावर पहाटेच्या नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटाजवळ वैष्णवी ट्रॅव्हेल्सच्या बस उलटल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. तर ३२ जखमी झाले आहेत.

केंद्रीय दारुगोळा भांडार स्फोटात २० जणांचा बळी, अहवाल मागविला केंद्रीय दारुगोळा भांडार स्फोटात २० जणांचा बळी, अहवाल मागविला

वर्ध्याजवळच्या पुलगावमधल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २० जणांचा बळी गेलाय. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग वर्ध्याला रवाना झाले आहे. शिवाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरही वर्ध्याच्या दिशेनं रवाना झालेत.