Maharashtra News

१० हजारांची नाणी जमा करुन भरला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज

१० हजारांची नाणी जमा करुन भरला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज

विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. नागपुरात एका उमेदवाराने तब्बल 10 हजार रूपयांची नाणी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. विलास बल्लमवार असं या शिक्षक उमेदवाराचं नाव आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.

नोटबंदीचा निर्णय चांगला असला तरी नियोजन चुकलं - शरद पवार

नोटबंदीचा निर्णय चांगला असला तरी नियोजन चुकलं - शरद पवार

सध्या सरकारचं धोरण सहकार चळवळीला पोषक आहे का असा विचार करण्याची वेळ आली आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

तटकरे बंधूमधील वाद संपवण्यासाठी शरद पवार सरसावले

तटकरे बंधूमधील वाद संपवण्यासाठी शरद पवार सरसावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद संपवण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावलेत. या दोघांनाही पवारांनी बारामतीला बोलावलं आहे.

वेळ पडली तर काँग्रेस आणि इतर स्थानिक आघाड्यांन सोबत लढू - राजू शेट्टी

वेळ पडली तर काँग्रेस आणि इतर स्थानिक आघाड्यांन सोबत लढू - राजू शेट्टी

 मी भाजपवर नाराज आहे असं म्हणण्या पेक्षा मी कोणत्याचं पक्षाच्या कारभारावर खुष नाही. आम्ही एका विशिष्ट हेतूने राजकारण करत आहे. पण लोकांची रस्त्यांवर असताना एक भाषा असते आणि  सत्तेत गेल्यावर एक भाषा हे मला पटत नाही आणि लोकांनाही आवडत नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीन निवडणुकीत उतरेल.

 आधारवाडी जेल झालंय ओव्हरफ्लो...

आधारवाडी जेल झालंय ओव्हरफ्लो...

आधारवाडी जेलमध्यै कैदी पाठवू नका असं फर्मान कल्याण सत्र न्यायालयाने काढलंय. राज्यातील कारागृहात कैद्यांची संख्या इतकी झालीये की आता कारागृहात कैदी घेतले जाणार नाहीत असे फर्मानच कारागृह प्रशासनाने काढलय. त्यामुळे आता कैदी ठेवायचे कुठे असा प्रश्न पोलिसांना आणि कारागृह प्रशासनाला पडलाय.

१० हजारांची नाणे घेऊन भरला निवडणुकीचा अर्ज

१० हजारांची नाणे घेऊन भरला निवडणुकीचा अर्ज

 विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. नागपुरात एका उमेदवाराने तब्बल 10 हजार रूपयांची नाणी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. 

विलास लांडे आणि लक्ष्मण जगतापांची मैत्री भुवया उंचावणारी...

विलास लांडे आणि लक्ष्मण जगतापांची मैत्री भुवया उंचावणारी...

पिंपरी चिंचवड मध्ये एकीकडं भाजप मध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरु असताना भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांची मैत्री मात्र अनेकांच्या भुवया उंच करायला कारणीभूत ठरतेय... कशी पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट

शरद पवार रमले जुन्या आठवणींमध्ये

शरद पवार रमले जुन्या आठवणींमध्ये

शरद पवार हे अनेकांना न समजलेलं कोडं, हे कोडं सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यात कुणालाही यश आलेलं नाही.

पुण्यातही शिवसेना-भाजपची युतीसाठी चर्चा

पुण्यातही शिवसेना-भाजपची युतीसाठी चर्चा

मुंबईपाठोपाठ पुण्यामध्येही महापालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात आज भाजप सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाली. आजच्या बैठकीत युतीच्या दृष्टीकोनातून सकारात्मक चर्चा झाली.

लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाही आहेत. पाथर्डी तालुक्यात लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय.

माओवाद्यांनी दिला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

माओवाद्यांनी दिला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माओवाद्यांनी दिला आहे. तशी पत्रकं त्यांनी एटापल्ली तालुक्यात टाकली आहेत.

 गडचिरोली जि.प.पं.स. निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

गडचिरोली जि.प.पं.स. निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माओवाद्यांनी दिलाय. तशी पत्रकं त्यांनी एटापल्ली तालुक्यात टाकली आहेत. 

ठाण्यात निवडणुकीआधी राष्ट्रवादीला धक्का

ठाण्यात निवडणुकीआधी राष्ट्रवादीला धक्का

ठाण्यातले राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक आणि १ माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे. विरोधी पक्षनेते संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, स्थानिक नगरसेवक उषा भोईर आणि माजी नगरसेवक रविंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

आश्रमशाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन शाळकरी मुलीचं लैंगिक शोषण

आश्रमशाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन शाळकरी मुलीचं लैंगिक शोषण

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच बीडमधल्या आश्रमशाळेत देखील अशीच घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातल्या सिंदफना इथं उसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलींसोबत शिक्षकच अश्लिल चाळे करत असल्याचं उघड झालं आहे.

भिलवडी बलात्कार आणि खून प्रकरण, आरोपीला 9 दिवसांची पोलीस कोठडी

भिलवडी बलात्कार आणि खून प्रकरण, आरोपीला 9 दिवसांची पोलीस कोठडी

जिल्ह्यातील भिलवडी येथील अल्पवयीनं मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर

नागपूर जिल्ह्यातील दोन गावांना नगर परिषदेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रोखून धरल्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूका लांबणीवर जाणे आता निश्चित झाले आहे.  

भिलवडी बलात्कारप्रकरणी एकाला अटक

भिलवडी बलात्कारप्रकरणी एकाला अटक

भिलवडी बलात्कारप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माळवाडीमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली होती.

दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक

दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक

दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात युती झाली नाहीतर भाजप-शिवसेनेला फटका : गिरीश बापट

पुण्यात युती झाली नाहीतर भाजप-शिवसेनेला फटका : गिरीश बापट

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. सध्या भाजपची हवा असली तरी आमच्या डोक्यात हवा गेलेली नाही, असेही ते म्हणालेत.