Maharashtra News

राज्यातही बैलगाडा शर्यती सुरु करण्याची मागणी

राज्यातही बैलगाडा शर्यती सुरु करण्याची मागणी

तामिळनाडूत जल्लिकट्टूसाठी वातावरण तापलेलं असतानाच आता राज्यातही बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात या मागणीसाठी आंदोलन सुरू झालंय. 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ क्लिपमुळे धक्कादायक घटना उघड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ क्लिपमुळे धक्कादायक घटना उघड

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार घडल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षांच्या मुलीवर तिच्या ओळखीच्या दोन मुलांनी बलात्कार केला. दरम्यान, व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सगळा प्रकार उघड झाला आहे. 

भाजप आमदाराची आमदारकी रद्द, कोळींची सर्वोच्च न्यायालयात धाव

भाजप आमदाराची आमदारकी रद्द, कोळींची सर्वोच्च न्यायालयात धाव

आमदारकी रद्द केल्याच्या निकालाविरोधात डॉ. देवराव होळी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांची शासकीय सेवेत असताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

नाशिक निवडणुकीची रक्तरंजित सुरुवात, सेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

नाशिक निवडणुकीची रक्तरंजित सुरुवात, सेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

महापालिका रणधुमाळीची रक्तरंजित सुरुवात झालीय. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळचा खून करण्यात आला आहे. राजकीय सुडापोटी ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसला अपघात

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसला अपघात

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसला झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झालेत तर १३ जण जखमी झालेत. 

संतापून त्यानं मुळ्याच्या अख्ख्या पिकावर फिरवला नांगर!

संतापून त्यानं मुळ्याच्या अख्ख्या पिकावर फिरवला नांगर!

लागवड केलेल्या भाजीपाल्याला अक्षरशः मातीमोल भाव मिळत असल्यानं, धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातल्या शेतकऱ्यानं आपल्या शेतातील मुळा पिकावर ट्रॅक्टर फिरवला. 

तिच्या आयुष्यातली 'कॅन्सर'ची फ्रेम... एक प्रेरणादायी कहाणी!

तिच्या आयुष्यातली 'कॅन्सर'ची फ्रेम... एक प्रेरणादायी कहाणी!

कॅन्सर म्हटल्यावर आपण गळीतगात्र होऊन जातो. मात्र, याच कॅन्सरशी जिद्दीने लढा देत आपल्या भावनांपेक्षाही प्राण्यांच्या भावनांना आपल्या मनात आणि नंतर कॅमेरात टिपणारी एक अवलिया म्हणजे सोनाली जोशी...

दुष्काळ नसतानाही मदत केली, दानवेंचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

दुष्काळ नसतानाही मदत केली, दानवेंचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय.

'पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं'

'पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं'

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असून, हल्लेखोरांना लक्ष्य ठेऊन त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

नाशिक कारागृहातले भाई जामिनावर बाहेर

नाशिक कारागृहातले भाई जामिनावर बाहेर

खून, दरोडे, खंडणी, प्राणघातक हल्ला अशा गंभीर गुन्ह्यात नाशिक कारागृहात असलेले भाई जामिनावर बाहेर सुटलेत

प्रशांत दामलेंच्या तक्रारीची नाशिक मनपाकडून दखल, अधिका-यांना नोटीस

प्रशांत दामलेंच्या तक्रारीची नाशिक मनपाकडून दखल, अधिका-यांना नोटीस

नाशिकमधील महाकवी कालिदास कला मंदिराच्या दुरवस्थेची महापालिका आयुक्त अशिषेक कृष्ण यांनी दखल घेतलीय.

वाड्यांचं पुणं होणार गगनचुंबी, नवे डीसी रूल प्रसिद्ध

वाड्यांचं पुणं होणार गगनचुंबी, नवे डीसी रूल प्रसिद्ध

राज्य सरकारने पुण्यासाठी नवीन डीसी रुल्स गुरुवारी प्रसिद्ध केले आहेत.

खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदाराचं निधन

खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदाराचं निधन

बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातले एकमेव साक्षीदार असलेले भैय्यालाल भोतमांगे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. 

पोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं

पोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं

पोलिसांना लाच देण्यासाठी आईचे मंगळसूत्र विकावे लागल्याची घटना नांदेडमध्ये समोर आलीय. 

'हजार-पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी पाठवा'

'हजार-पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी पाठवा'

हजार पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवा अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे.

मिसळफेम सीताबाई निवडणूक लढण्यासाठी इच्छूक

मिसळफेम सीताबाई निवडणूक लढण्यासाठी इच्छूक

मनपा निवडणुकीचे बिगूल वाजायला लागल्यावर हवशे नवशे गवशे या साऱ्यांनीच गर्दी केलीय.

महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीचा भरवर्गात विनयभंग

महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीचा भरवर्गात विनयभंग

अलिबाग तालुक्यातील चौलमधील महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीशी भरवर्गात अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणा-या शिक्षकाविरूदध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

रत्नागिरीच्या चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कार पळवली

रत्नागिरीच्या चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कार पळवली

सातारा-पुणे मार्गावर एक धक्कादाय प्रकार घडलाय. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत गाडी घेऊन प्रवाशांनीच पलायन केले. रत्नागिरीतील आंबेशेत येथील मुन्ना घोसाळे यांची स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यानी पळवून नेलीय. 

शहीद जवानाचे सैन्य किट बसस्थानकावर बेवारस

शहीद जवानाचे सैन्य किट बसस्थानकावर बेवारस

उरी येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या यवतमाळच्या पुरड येथील विकास कुडमेथेंची सैन्य किट यवतमाळच्या बसस्थानकावर बेवारस आढळल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान शहीद जवानाचे साहित्य असे बेवारस आढळल्यानें संतापही व्यक्त होत आहे.

पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार, सर्व आरोपी अटकेत

पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार, सर्व आरोपी अटकेत

शहराजवळील साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार आणि पेट्रोलपंप मालकावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

जेवणात वांग्याच्या भाजीचा बेत आवर्जुन ठरलेला असतो. अनेकांसाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आवडीचं. याच वांग्याचं झाडं तुम्ही पाहिलं असेलच. मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नांदेडमधील एक अनोखं वांग्यांच झाड.