Mumbai News

मूल दत्तक घेण्याच्या नियमांमध्ये बदल

मूल दत्तक घेण्याच्या नियमांमध्ये बदल

मूल दत्तक प्रक्रिया नियमांमध्ये सरकारकडून बदल करण्यात आलाय. मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत इच्छुक पालकांना आतापर्यंत असलेला मूल निवडण्याचा अधिकार काढून घेण्यात आलाय. 

रेरा कायद्याची आजपासून अंमलबजावणी

रेरा कायद्याची आजपासून अंमलबजावणी

बांधकाम व्यवसायाला शिस्त लावतानाच बिल्डरांच्या विस्कळीत आणि मनमानी कारभाराला चाप लावणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट अर्थात रेरा कायदा महाराष्ट्रात आजपासून लागू होणार आहे. 

राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह

राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह

आज एक मे. भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज ५८वा वर्धापन दिन आहे. या निमित्तानं राज्यभरात विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

वैद्यकीय प्रवेशातील मराठी मुलांच्या आरक्षणाला स्थगिती

वैद्यकीय प्रवेशातील मराठी मुलांच्या आरक्षणाला स्थगिती

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात 67.5 टक्के जागा मराठी मुलांसाठी ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

धक्कादायक! तुम्ही पित असलेल्या ज्यूसमधील बर्फ दूषित

धक्कादायक! तुम्ही पित असलेल्या ज्यूसमधील बर्फ दूषित

उन्हाचा कडाका जसजसा वाढतोय तसतसा ज्यूस सेंटर्सवर मोठी गर्दी पाहायला मिळते. ज्यूससोबत जास्त बर्फाची विशेष मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मात्र हाच बर्फ किंवा बर्फाचा गोळा जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीची कोंडी फुटली

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीची कोंडी फुटली

सकाळपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर सुरु असलेली वाहतुकीची कोंडी अखेर फुटली आहे.

 मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासानंतर फुटली

मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासानंतर फुटली

माणगावमध्ये रस्ता अरुंद असल्यानं 5 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबईत रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबईत रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी जोगेश्वरी डाउन स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी 4 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.

मुंबईत रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांवर आता बंदी, गाड्याच दिसणार नाहीत!

मुंबईत रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांवर आता बंदी, गाड्याच दिसणार नाहीत!

शहरात रस्त्याच्या कडेला आता हातगाड्यांवरील अन्न पदार्थ दिसणार नाहीत. कारण ३०  मेनंतर थेट कारवाई करण्यात येणार आहे. अन्न पदार्थ शिजवणाऱ्या गाड्यांना हद्दपार करण्याचा महापालिकेने विडा उचला आहे.

खराब नोटा स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही - आरबीआय

खराब नोटा स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही - आरबीआय

अनेक वेळा तुमच्याकडे खराब नोट असेल तर अनेक अडचणी निर्माण होत असतात. व्यवहार करताना खराब नोटा स्वीकारल्या जात नाही. तसेच बॅंकेत बदलण्यासाठी गेले असता काहीवेळा खराब नोटा घेतल्या जात नाही. मात्र, यापुढे आता असे होणार नाही. खराब नोटा स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही, असे आरबीआय स्पष्ट केले आहे.

एक किलो दही नऊ हजार रुपयांना!

एक किलो दही नऊ हजार रुपयांना!

मध्य रेल्वेने गेल्यावर्षी जानेवारीत १५०० किलो दह्यासाठी तब्बल दीड कोटी रूपये खर्च केलेत.

'बाहुबली २'नंतर मुंबई पोलिसांची कल्पकबुद्धी! नागरिकांना केला सवाल...

'बाहुबली २'नंतर मुंबई पोलिसांची कल्पकबुद्धी! नागरिकांना केला सवाल...

'बाहुबली २' आणि या सिनेमाशी संबंधित 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं' हा अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा प्रश्न मुंबई पोलिसांनीही उचलून धरलाय. 

मुंबईत पुन्हा व्हेज - नॉन व्हेज वाद पेटणार!

मुंबईत पुन्हा व्हेज - नॉन व्हेज वाद पेटणार!

मनसेच्या एका खुल्या पत्रामुळे मुंबईत पुन्हा एकदा व्हेज - नॉन व्हेजचा वाद पेटणार, असं दिसतंय. 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही

सुटीच्या दिवशीही तूर खरेदी होणार आहे. तशी घोषणा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. सलग सुट्या आल्यामुळे तूर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, सुटीतही तूर खरेदी होणार आहे.

मुंबईत शिधावाटप कार्यालयात चक्क साड्यांची खरेदी

मुंबईत शिधावाटप कार्यालयात चक्क साड्यांची खरेदी

सरकारी कार्यालयात अक्खा साडीचा स्टॉल मांडलेला कधी पाहिलाय का ?  मुलुंड मधील शिधावाटप कार्यालयात अस घडलंय.

वैद्यकीय, डेंटल कॉलेजमध्ये ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव

वैद्यकीय, डेंटल कॉलेजमध्ये ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव

अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर वैद्यकीय आणि डेंटलच्या ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

स्कॉटलंड यार्ड पोलिसांना लाजवणारा मुंबई पोलिसांचा कारनामा...

स्कॉटलंड यार्ड पोलिसांना लाजवणारा मुंबई पोलिसांचा कारनामा...

स्कॉटलंड यार्ड पोलिसांनाही लाजवेल, असा कारनामा मुंबई पोलिसांनी करून दाखवलाय. बहुचर्चित लखन भय्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी शैलेंद्र ऊर्फ पिंकी पांडे 2014 पासून फरार होता. मुंबई हायकोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर, अवघ्या आठवडाभरात पोलिसांनी त्याला अटक केली. 

मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण-ठाकुर्लीदरम्यान रेल्वे रुळाला तडा

मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण-ठाकुर्लीदरम्यान रेल्वे रुळाला तडा

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. सकाळी सकाळी मध्यरेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. 

तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना

तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना

राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्यात पहिल्यांदाच तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक २२ एप्रिल २०१७  पर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

राज्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 27 मे रोजी मतदान

राज्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 27 मे रोजी मतदान

राज्यातील विविध 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केली.

३४ जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र होणार सुरु

३४ जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र होणार सुरु

राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यातील मुंबई आणि उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली असून यासबंधीचा शासननिर्णय कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाने दि. २६ एप्रिल २०१७ रोजी निर्गमित केला आहे.