महाराष्ट्र
नगरसोल-नांदेड पॅसेंजरला अपघात, १०० जखमी
परभणी जिल्ह्यातल्या सातोना-उस्मापूर स्टेशनवर उभ्या असलेल्या नगरसोल-नांदेड पॅसेंजरला अपघात झाला आहे. पॅसेंजरला एका इंजिननं धडक दिल्यानं १०० प्रवासी जखमी झाले आहेत.
प्रतिक्रिया(0)
३१ मे रोजी एनडीएने पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहिल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. काल भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
प्रतिक्रिया(0)
परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेचं हॉस्पिटल सील करण्यात आलंय. उपजिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली.
प्रतिक्रिया(1)
एक नजर टाकुयात मुंबई, डोंबिवली, शिर्डी आणि सोलापूरात आज वेगवेगळ्या पक्षांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांवर. विशेष म्हणजे या आंदोलनात ला सामान्यांचा सहभागही उल्लेखनीय होता.
प्रतिक्रिया(1)
पवारांच्या घरात आणखी एक जमीन घोटाळा
महार वतनाची जमीन बळकावल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांच्याविरोधात पुण्यातल्या पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिका-यांची बनावट ऑर्डर तयार करुन ही जमीन बळकावल्याचा आरोप शर्मिला यांच्यावर आहे.
प्रतिक्रिया(1)
एस.आर.एचा प्रताप, घरांसाठी मृतांची संमती
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा म्हणजेच एस.आर.ए.चा आणखी एक प्रताप पुण्यात पुढे आलाय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मृत व्यक्तीना पात्र ठरवण्यात आलंय. त्यासाठी या मृत व्यक्तींची संमती मिळवण्याचा चमत्कारही एसआरएनं करून दाखवलाय.
प्रतिक्रिया(1)
उत्तराखंडात ‘सेस’ हटला; महाराष्ट्रात ‘व्हॅट’चं काय?
उत्तराखंड सरकारनं मात्र या महागाईपासून आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी पेट्रोलवाढीवरचा सेस हटवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारही महागाईनं होरपळणाऱ्या सामान्यांना दिलासा देईल का?
प्रतिक्रिया(2)
पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता...
मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...
प्रतिक्रिया(4)
शिवसेना-भुजबळ सामन्यात मनसेची भूमिका काय?
नाशिकच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक होतेय. यावेळी नाशिकमध्ये भाजप शिवसेना आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला काँग्रेस साथ देणार आहे. असं असलं तरी सामना शिवसेना विरुद्ध छगन भुजबळ असाच होणार असल्याच सांगण्यात येतंय.
प्रतिक्रिया(0)
बोगस कंपन्यांनपासून सावधान सावधान…
15 हजार रुपये भरा, कंपनीचे सभासद व्हा आणि 2 वर्षांनंतर आजीवन दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळवा’ अशी फसवी योजना जाहीर करून नगरकरांना 15 कोटींचा गंडा घालणारी बदमाश कंपनी अखेर पर्दाफाश झाला.
प्रतिक्रिया(0)
गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड






