विश्व
भारत-पाक बैठक; सईद, दाऊद यांच्यावर चर्चा
भारत आणि पाकिस्तानमधील प्रमुख अधिकाऱ्यांची आज एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पहिल्यांदाच आयबी आणि एनआयएसांरख्या चौकशी संस्था यात भाग घेणार आहेत. या बैठकीत सईद आणि दाऊद यांसारख्या गुन्हेगारांना भारताकड सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया(0)
२०१२ मध्ये जवळजवळ ७.५ करोड तरुण बेरोजगार राहतील, असं ‘आंतरराष्ट्रीय श्रम संगठन’नं (आयएलओ) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.
प्रतिक्रिया(0)
पाकमधल्या ऐतिहासिक हिंदू मंदिरात तोडफोड
पाकिस्तानात पश्चिम भागातल्या पेशावरमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेल्या एका मंदिरात काही अज्ञात लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना घडलीय. पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल १६० वर्षांनी या मंदिराचे दरवाजे मागच्या वर्षी उघडण्यात आले होते.
प्रतिक्रिया(5)
मार्क झुकरबर्गचं ‘Status’ झालं ‘Married’
तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ऑर्कूट सोशल नेटवर्किंग वेबसाईटला आव्हान देत फेसबुकची निर्मिती करणारा मार्क झुकरबर्ग लग्नाच्या बेडीत अडकला आहे. कॅलिफोर्नियाच्या प्रिसिला चॅनशी झुकरबर्ग विवाहबद्ध झाला आहे.
प्रतिक्रिया(1)
हिंदूंच्या रक्षणासाठी वेगळा कायदा कशाला?
पाकिस्तानचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधिश मोहम्मद चौधरी यांनी एक याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केलं की पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना म्हणजेच हिंदूंना सुरक्षेसाठी वेगळ्या कायद्याची गरज नाही.
प्रतिक्रिया(2)
ओसामाच्या पाकमधील घराचे मॉडेल सार्वजनिक
कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन यांच्या पाकिस्तानातील घरावर हल्ला करण्यासाठी अमेरिकन नौदलाने ज्या छोट्या प्रकृतीचा वापर केला होता. ते मॉडेल आज सार्वजनिक करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया(0)
पॅरीसच्या भारतीय दूतावासावरील हल्ला फसला
आल्जेरियन वंशाचा एक आतंकवादी तालिबानच्या सूचनेवरून पॅरीसमधील भारतीय दूतावासावर हल्ला करण्याच्या बेतात होता. फ्रांसच्या सुरक्षा पथकाने या आतंकवाद्याला घातपात करण्यापूर्वीच मारण्यात आलं आहे.
प्रतिक्रिया(0)
वॉशिंग्टनमध्ये शीख पगडीधारी पोलीस
शीख पोलिसांना आपल्या धार्मिक चिन्हांसहीत काम करण्याची परवानगी देणारं, वॉशिंग्टन हे अमेरिकेतील पहिलं शहर ठरलं आहे.
प्रतिक्रिया(1)
धर्मगुरू दलाई लामांच्या सुरक्षेत वाढ
तिबेटीईन धर्मगुरू दलाई लामा यांना जीवे मारण्याच्या कटानंतर दलाई लामा यांची सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दलाई लामा यांनी नुकतीच चीनने एका महिलेला त्यांच्या भाविकेच्या रुपात पाठवून जीवे मारण्याचा कट आखल्याचा सुतोवाच केला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया(0)
छोटा शकील, मेमनला अमेरिकेत बंदी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन या दोघांवर अमेरिकेची बंदी घालण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळं अमेरिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रतिक्रिया(0)
गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड






