24taas.com
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची केनियासोबत मॅच फिक्सिंग

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची केनियासोबत मॅच फिक्सिंग

पाकिस्तान-केनिया दरम्यान वर्ल्ड कपमध्ये झालेली मॅच फिक्स असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. श्रीलंकेतील हम्बनटोटामध्ये झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानविरूद्ध केनियाच्या बॉलर्सने ३७ वाईड बॉल्स टाकले होते.
प्रतिक्रिया(0)
भज्जी -गीता लवकरच विवाह बंधनात

भज्जी -गीता लवकरच विवाह बंधनात

टीम इंडियाचा स्पिनर आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हरभजन सिंग लवकरच मॉडेल अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.सप्टेंबरमध्ये आपण विवाहबद्ध होणार असल्याचे स्वत: भज्जीनेच सांगितलं आहे.
प्रतिक्रिया(1)
जोहल – पॉमर्सबॅचमध्ये ‘बट्टी’

जोहल – पॉमर्सबॅचमध्ये ‘बट्टी’

ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ल्यूक पॉमर्सबॅच आणि सिद्धार्थ माल्या या दोघांना आता चांगलाच दिलासा मिळालाय. कारण, अमेरिकन महिला जोहल हमीद हिनं या दोघांवर दाखल केलेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.
प्रतिक्रिया(0)
चेन्नई जिंकली, मुंबईला घरी पाठवलं

चेन्नई जिंकली, मुंबईला घरी पाठवलं

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची आक्रमक फलंदाजी व त्याच्या कल्पक नेतृत्वामुळे चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा ३८ धावांनी पराभव करीत क्‍वॉलिफायर- २ मध्‍ये सहज प्रवेश केला.
प्रतिक्रिया(0)
शाहरुखने दाखवला प्रेक्षकाला बूट

शाहरुखने दाखवला प्रेक्षकाला बूट

वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा रक्षकांशी झालेल्या बाचाबाचीचे प्रकरण अजून कुठे थंड झाले नसताना कोलकता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवुड किंग शाहरुख खान पुन्हा एकदा नव्या प्रकरणात फसताना दिसत आहे. पुण्यात कोलकता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअर डेव्हिलच्या सामन्याच्यावेळी शाहरुखने कमेंट करणाऱ्या प्रेक्षकाला बूट दाखविल्याचे एका चॅनलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
प्रतिक्रिया(3)
टेनिसमध्ये युकी भांबरीचा पहिला नंबर

टेनिसमध्ये युकी भांबरीचा पहिला नंबर

मागच्या आठवड्यात उजबेकिस्तानात झालेली चॅलेंजर टूर्नामेंट जिंकून युकी भांबरी भारतातला नंबर एकचा टेनिस खेळाडू बनलाय. युकीची ही आपल्या कार्यकालातील पहिलीच टूर्नामेंट होती. फायनलमध्ये इस्राईलच्या आमिर वेनट्राबचा ६-३, ६-३ असा पराभव करत भांबरीनं ७९व्या स्थानावर उडी मारलीय.
प्रतिक्रिया(0)
केकेआरने फायनल गाठली, दिल्लीने पाठ दाखवली

केकेआरने फायनल गाठली, दिल्लीने पाठ दाखवली

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कोलकाताने फायनलमध्ये धडक मारली आहे. शाहरूखने टीम खरेदी केल्यानंतर तब्बल पाचव्यावर्षी त्याच्या टीमने फायनलमध्ये झेप घेतली आहे. कोलकत्याने १८ रनने विजय मिळवला आहे.
प्रतिक्रिया(0)
सुवर्णकन्यांना अजूनही बक्षिसाची रक्कम नाहीच

सुवर्णकन्यांना अजूनही बक्षिसाची रक्कम नाहीच

भारताच्या महिला टीमनं कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. त्या तीन खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.
प्रतिक्रिया(1)
‘चेल्सी – चॅम्पियन ऑफ दी युरोप’

‘चेल्सी – चॅम्पियन ऑफ दी युरोप’

107 वर्षांच्या इतिहासात ‘चेल्सी’नं पहिल्यांदाच युरोपियन चॅम्पियन्स लीग जिंकलीय. पेनल्टी शूट आऊटमध्ये बार्यन म्युनिकचा 4-3 असा पराभव करत चेल्सीनं विजेतपद पटकावलयं.
प्रतिक्रिया(0)

गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड

गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड