मुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे अनावरण

मुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे अनावरण

मुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या लोगोची संकल्पना तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहा काय आहे ही संकल्पना?

व्हिडिओ: वांद्रे-वरळी सी लिंकवर ‘सुसाईड ड्रामा’!

व्हिडिओ: वांद्रे-वरळी सी लिंकवर ‘सुसाईड ड्रामा’!

वांद्रे-वरळी सी लिंकवर सोमवारी रात्री सुसाईड ड्रामा पाहायला मिळाला. संपत चौधरी नावाच्या एका व्यक्तीनं सी-लिंकवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी सुरु झाली धावपळ.

देवेंद्र फडणवीस सरकार गिरवणार मोदींचाच कित्ता

देवेंद्र फडणवीस सरकार गिरवणार मोदींचाच कित्ता

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर मंत्री कार्यालयातील सगळा जुना स्टाफ बदलला होता. मंत्रालयातील स्टाफची नियुक्ती करताना देवेंद्र फडणवीस सरकार मोदींचाच कित्ता गिरवणार असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी जुन्या मंत्र्यांचे खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक सध्या नियुक्तीसाठी जोरदार लॉबिंग करताना दिसत आहे.

शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल?

शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल?

 लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरुन दान टाकलं. नव मतदारांची ताकद काय असते, तेही याच निवडणुकीनं दाखवून दिलं.  आता पुन्हा विधानसभेचा कौल कुणाच्या हातात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची चावी शहरी मतदाराच्या हाती दिसत आहे. शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल, निवडणूक जिंकण्याचा नवा मंत्र, शहरांकडे चला ! , असाच दिसतोय.

निवडणुकीचा रणसंग्राम...पण राजधानी मुंबईत चिडीचूप

निवडणुकीचा रणसंग्राम...पण राजधानी मुंबईत चिडीचूप

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटतायत. पण राजधानी मुंबईत मात्र सध्या चिडीचूप आहे. अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्यानं उमेदवारांना प्रचार सुरु करता आलेला नाहीय.

शरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट

शरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या  रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत  तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या  नेत्यांना दिलाय. 

मायानगरी मुंबईत ती कशी आली, तिची कर्मकहाणी..

मायानगरी मुंबईत ती कशी आली, तिची कर्मकहाणी..

मायानगरी मुंबईत दररोज अनेकजण येऊन धडकतात. कुणी कामानिमित्त, कुणी गरजेपोटी. कुणी हौसेनं तर कुणी बळजबरीनं. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. मुंबईच्या गर्दीत ही मुलं कुठं हरवतील, याचा नेम नसतो. आफ्रिकेतल्या इथिओपिया देशातून आलेल्या अशाच एका मुलीची ही कर्मकहाणी. 

2009च्या निवडणुकीत मिळालेलं मतदान आणि टक्केवारी

2009च्या निवडणुकीत मिळालेलं मतदान आणि टक्केवारी

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक आज अखेर निवडणूक आयोगानं जाहीर केलं. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, याआधीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता आल्या होत्या. त्याची काय आहे टक्केवारी, याचा एक रिपोर्ट.

निवडणुका जाहीर : राज्यात विभागवार काय आहे पक्षीय बळाबळ

निवडणुका जाहीर : राज्यात विभागवार काय आहे पक्षीय बळाबळ

महाराष्ट्र आणि हरियाणात एकसाथ आणि एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, याआधीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला विभागवार किती जागा मिळाल्या होत्या. याचा एक रिपोर्ट.

काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिकांची प्राणाची बाजी

काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिकांची प्राणाची बाजी

धरती पर कही स्वर्ग है तो यही है। असं वर्णन असणारं काश्मीरखोरं. हे खोरं सध्या मात्र पाण्याखाली गेलं आहे. आता धडपड सुरू आहे ती लोकांना वाचवण्याची. आणि या संकटकाळी काश्मीरी जनतेसाठी कुणी धावून आलं असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक. आज काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.

राष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र

राष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असला तरी राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळत नाहीयत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्यामुळं या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या घटल्याचं चित्र यावेळी दिसतंय.

 महाेत्सव विधानसभा निवडणुकांचा

महाेत्सव विधानसभा निवडणुकांचा

अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज झालाय. सण साजरे करतानाच राज्याला वेध लागलेत ते लोकशाहीच्या उत्सवाचे, अर्थात निवडणुकांचे. संस्कृती जपणारे आपले सण आणि लोकशाही घडवणारा निवडणुकांचा उत्सव. यांची एक वेगळी सांगड. मतदारराजासाठी. 

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसे 'कनफ्यूज'

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसे 'कनफ्यूज'

राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, अजूनही निश्चित नाही.... निवडणुकीबाबतच्या त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा राज यांनी केलाय.... त्यामुळ कनफ्युजनमध्ये आणखी भरच पडलीय.

स्टिंग ऑपरेशन : हे पाहिल्यानंतर तुम्ही चायनीज खाणं बंद कराल!

स्टिंग ऑपरेशन : हे पाहिल्यानंतर तुम्ही चायनीज खाणं बंद कराल!

चायनिज खाद्यपदार्थ आता भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. चायनिज खाद्यपदार्थाच्या जोडीला विविध सॉस आपण आवडीन खातो पण चायनिजमध्ये वापरले जाणारे हे सॉस कसे जीवघेणे ठरू शकतात, 

सांगा कसं होणार सामांन्यांचं काम?.. राज्यात लेट लतिफगिरी

सांगा कसं होणार सामांन्यांचं काम?.. राज्यात लेट लतिफगिरी

सरकारी अधिका-यांची लेट लतिफगिरी कमी करण्यासाठी मंत्र्यांचा व्हॉट्स अॅपवर ग्रुप बनवण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यंकय्या नायडूंना नुकताच दिला. त्याअगोदर दोन केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये अचानक धडक देऊन तिथली अनास्था अधिका-यांच्या लक्षात आणून दिली होती. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कार्यालयांत काय परिस्थिती आहे, याचा वेध घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला. 

वीर पत्नीची ही व्यथा ऐकून न्यायालयही झालं सुन्न

वीर पत्नीची ही व्यथा ऐकून न्यायालयही झालं सुन्न

आज कारगिल दिन... त्याच्या विजयाचं सेलिब्रेशन करायला हवंच... पण, याच विजय दिनानिमित्त डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही बातमी... ज्यांनी देशासाठी जीव दिला, त्या जवानांशी आपली सरकारी यंत्रणा किती मुर्दाड आणि बेफिकीर आहे, त्याची ही कथा... गेली ४९ वर्षं एक वीरपत्नी संघर्ष करतेय... तिची व्यथा ऐकून न्यायालयही सुन्न झालं... 

'कारगिल विजयाचा' तो क्षण... आजही डोळ्यांत आणतो पाणी!

'कारगिल विजयाचा' तो क्षण... आजही डोळ्यांत आणतो पाणी!

कारगिल विजयाला आज बरोबर 15 वर्ष पूर्ण झालेत. हा दिवस 'कारिगल विजय दिवस' म्हणून ओळखला जातो.

स्टींग ऑपरेशन : कागल आरटीओ अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा पर्दाफाश

स्टींग ऑपरेशन : कागल आरटीओ अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा पर्दाफाश

कोल्हापूर जिल्हयातल्या कागल प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर वाहन चालकांची खुलेआम लूट केली जातेय. ही माहिती मिळाल्यानंतर ‘झी मीडिया’ची टीम तिथं पोहोचली.  

आजच्या काळातील  सत्यवानने पत्नीला दिला पुनर्जन्म

आजच्या काळातील सत्यवानने पत्नीला दिला पुनर्जन्म

शाहजहाननं मुमताझसाठी ताज महाल उभा केला आणि आज तो प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. तर सावित्रीने सत्यवानाला मृत्यूनंतरही परत मिळवलं. त्यामुळेच प्रेमाची ताकद अतूट मानली जाते. आज अशीच एक गोष्ट. आजच्या काळातल्या सत्यवानाची. त्यानं त्याच्या पत्नीला पुनर्जन्म दिलाय.

मुंबई महापालिकेतील अजब चोरीची गजब कथा!

मुंबई महापालिकेतील अजब चोरीची गजब कथा!

मुंबई महापालिकेचा अख्खाच्या अख्खा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प विभागीय कार्यालयातून चोरीला गेलाय.

पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनिअर्सच्या हातात फावडे

पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनिअर्सच्या हातात फावडे

कुणाची मदत कधी आणि कशी घेता येईल हे एकदा का प्रशासनाच्या लक्षात आलं की मग काम झालंच म्हणून समजा... मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनाही डोंगरांच्या  कडेकपा-यांत कचरा दिसला... पण तिथली साफसफाई पालिकेच्या कर्मचा-यांनी केली नाही... मग कुणी केली साफसफाई?