आठवणीतील आनंदी..., aanadi joshi blog

आठवणीतील आनंदी...

आठवणीतील आनंदी...
www.24taas.com, मुंबई

आनंदी जोशी (गायिका)

`एखाद्या गाण्याची `एक ओळ` खूप काही देऊन जाते.... आणि मी हरखून जाते.. गाणं हा माझ्या आयुष्याचा जगण्याचा अविभाज्य भाग होऊन गेला आहे. एखादं गाणं अगदीच साधं असतं... पण त्या गाण्यातला एखादा शब्द पण खूप काही देऊन जातं... `

मराठी सारेगमप... या रियालिटी शोच्या माध्यामातून मी सगळ्यासमोर आले.. सारेगमपने मला खूप काही दिलं, आमचं पर्व हे पहिलं पर्व होतं. त्यामुळे त्याला मिळणारा प्रतिसाद आणि प्रसिद्धी काही औरच होती. पण गाणं हा त्याचा गाभा होता. आणि आम्हा सर्वांचा आत्मा.

सारेगमपमध्ये आम्ही आमचं अक्षरश: आमचं आयुष्य जगलो.... टॉप ४ पर्यंतचा प्रवास कधीही न विसरता येण्यासारखाच आहे. सारेगमपने एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला. आज अनेक सिनेमातून माझा आवाज आपणापर्यंत पोहचतोय... आणि मुळात तो आपणा सर्वांना आवडतोय.. सारेगमप दरम्यानची एक आठवण आपल्या सगळ्यांना सांगावीशी वाटतेय.

`खळे काका` संगीत क्षेत्रातील अढळपदी असणारे असे ज्येष्ठ संगीतकार... यांना सारेगमपच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता. आयुष्यातील अविस्मरणीय असा हा क्षण होता. खळे काका गेले अन् संगीत क्षेत्रातील ती जादू कुठेतरी हरवली असंच वाटतं. त्यांना भेटल्यानंतर त्यांचा नम्रपणा खूप भावला. जगण्याची दिशा देऊन गेला. आज पुन्हा `त्या साऱ्या` आठवणी ताज्या झाल्या.

मित्रांनो 'झी २४ तास'च्या www.24taas.com या सेलिब्रेटी ब्लॉग वेबसाईटच्या माध्यमातून मी अशाच काही आठवणी, गमती जमती तुमच्यासाठी यापुढेही घेऊन येणार आहे.. तर पुन्हा भेटूच...


शब्दांकन - रोहित गोळे

First Published: Sunday, August 26, 2012, 17:17


comments powered by Disqus