हो ही मुस्कटदाबीच...

कौशल इनामदारहो हो हो...... ही आमची मुस्कटदाबीच आहे... सोशल मीडिया म्हणजे आजच्या तरूणाईचा श्वास... फेसबुक म्हणजे लाखो दिलो की धडकन. कारण की, त्यांना मिळालेलं ते हक्कांच व्यासपीठ आहे...

Updated: Feb 29, 2012, 04:02 PM IST

कौशल इनामदार 

 

हो हो हो...... ही आमची मुस्कटदाबीच आहे... सोशल मीडिया म्हणजे आजच्या तरूणाईचा श्वास... फेसबुक म्हणजे लाखो दिलो की धडकन. कारण की, त्यांना मिळालेलं ते हक्कांच व्यासपीठ आहे... फेसबुक आणि गुगल यासारख्या माध्यमातून असंख्य घटनांना क्षणार्धात एक प्रकारचा न्याय मिळतो आहे. त्यामुळे आजच्या तरूणाईचा श्वास बनलेल्या या गोष्टीवर जर का सरकार बंदीची भाषा करत असेल तर हा अभिव्यकती स्वातंत्र्यावर घालाच घातला जातो आहे. त्यामुळे या सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे.

 

कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार फेसबुक आणि गुगल यांच्यावरील आक्षेपार्ह मजकूरावर या साईटने बंदी घालावी, नाहीतर या साईटसना त्यासाठी जबाबदार धरण्यात येईल, आता सिब्बल यांनी हे देखील स्पष्ट करावं की नक्की कोणत्या प्रकारचा आक्षेपार्ह मजकूरांना या सीईटनी मान्यता देऊ नये. काँग्रेस विरूद्ध वक्तव्य म्हणजे का आक्षेपार्ह मजकूर...  त्यासांठीच बहुधा ही बंधनं ह्या साईटसवर घालण्याचा मानस  या सिब्बल सरकारनी आपल्या मनी बाळगला असावा.

 

अण्णांनी भष्ट्राचाराविरोध मोहिम उघडली आणि त्यांना अभूतपूर्व असा पाठिंबा संपूर्ण भारतातून मिळू लागला. त्यानंतर मात्र सरकारचे धाबे चांगलेच दणाणले. त्याला या सोशल मीडियामुळे खूप मोठ्या प्रमाणात उचलून धरलं. त्यामुळे सरकारविरोधी वाढता उद्रेक आणि भविष्यात त्यांचे भोगावे लागणारे परिणाम याच्या काळजीने सरकारमधील काही मान्यवर अतिशय चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र यांना लक्षात ठेवावं सोशल मीडियावर कोणीच बंधनं आणू शकत नाही. कारण की आज प्रत्येकाला आपलं मत मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाल्याने प्रत्येकाला हा मीडिया आपलासा वाटू लागला आहे. आणि याची ताकद देखील फार मोठी आहे. त्यामुळे यापुढे सरकारने याची जाणीव ठेऊन वागल्यास याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

 

शब्दांकन- रोहित गोळे