कपिल शर्माने दाखवला सनी लिऑनला ‘बाबाजी का ठुल्लू’

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, December 16, 2013 - 16:42

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या हॉट अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या कॅनडियन पॉर्न स्टार सनी लिऑनला कॉमेडी किंग कपिल शर्माने बाबाजी का ठुल्लू दाखवला आहे. तिच्या ‘डर्टी’ भूतकाळामुळे कपिलने सनी लिऑनला आपल्या शोमध्ये बोलविण्यास नकार दिला आहे.
बिग बॉस या टीव्ही शोद्वारे भारतीय मनोरंजन विश्वात दाखल होणाऱ्या सनी लिऑन हीने पूजा भट्ट हिच्या ‘जिस्म 2’ मध्ये काम केले आणि बॉलिवुडमध्ये हंगामा केला.

दुसरीकडे कॉमेडी किंग कपिल शर्मा याने आपल्या बहारदार कॉमेडीच्या जोरावर अल्पावधीतच चांगली प्रसिद्धी मिळवली. कपिलच्या शोमध्ये येण्यास ब़ॉलिवुड कलाकारांची रिघ लागलेली असते. कपिलच्या शोमध्ये शाहरूख खान, अनिल कपूर आणि अनेक आघाडीचे कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
सनी लिऑन हिला आपल्या ‘जॅकपॉट’ या चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते, तेही कपिलच्या कॉमेडी नाइट्समध्ये.... पण कपिलने तिच्या ‘डर्टी’ भूतकाळामुळे तिला आपल्या शोमध्ये बोलविण्यास नकार दिला. सनी लिऑन हिने यापूर्वी बऱ्याच ऍडल्ट चित्रपटात काम केले आहे. तिला आपल्या स्वच्छ प्रतिमेच्या शोमध्ये बोलावून कपिलला आपल्या शोची प्रतिष्ठा कमी करायची नाही, असल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे जॅकपॉटच्या टीमला कपिलने प्रमोशनसाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013 - 16:42
comments powered by Disqus