<B> <font color=red>फिल्म रिव्ह्यू :</font></b> मनोरंजक `क्रिश ३`

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, November 1, 2013 - 20:11

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बरीच वाट पाहिल्यानंतर एक सुपरहिरो असलेला सिनेमा ‘क्रिश ३’ शुक्रवारी मोठ्या पडद्यावर झळकलाय. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेली टेक्नॉलॉजी... बॉलिवूडमध्ये एक वेगळी छाप उमटवण्यात त्यामुळेच हा सिनेमा यशस्वी झालाय.
सुपरहिरो ऋतिक
सुपरहिरोच्या रुपात ऋतिक रोशननं आपल्या अभिनयाचीही ठोस छाप उमटवलीय. बॉलिवूडमध्ये सुपरहिरोच्या भूमिकेत ऋतिकला तोड नाही हे ऋतिकनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
मसालेदार सिनेमा
‘क्रिश ३’मध्ये मनोरंजनाचा सगळा मसाला ठासून भरलाय. यातील काही दृश्य हॉलिवूडला टक्कर देण्याच्या तोडीचे ठरलेत. सिनेमाच्या कथेविषयी कुणालाही तक्रार करण्याची सोय नाही कारण, सुपरहिरो असणारे सिनेमा म्हणजे वाईटावर चांगल्यानं मात करणं...
संवाद
‘क्रिश एक विचार आहे ज्याला कोणताही ‘काल’ संपवू शकत नाही’.... यांसारखे सिनेमातील काही संवाद फारच मजेशीर आणि रोमांचक ठरलेत. सिनेमात काही कमतरता जरुर आहेत, परंतु तुम्ही या कमतरतेकडे थोडी डोळेझाक केली तर हा सिनेमा तुमचं नक्कीच मनोरंजन करेल.
अभिनय
‘काया’च्या रुपात कंगना रानौतनं खूपच साध्या पद्धतीनं उठावदार कामगिरी केलीय. ‘काल’च्या रुपात विवेक ऑबेरॉय आणखीन भयानक आणि उठावदार करू शकला असता. सिनेमातील इतर ‘व्हिलन’च्या भूमिका हॉलिवूड ‘एक्स-मेन’ सिरीजच्या प्रभावाखाली आहेत. परंतु, विवेकनं आपल्या पद्धतीनं चांगलाच अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय.
सिनेमा पूर्णत: ऋतिक रोशनवरच आधारित आहे. तो सुपरहिरोच्या कॉस्च्युममध्ये आणखीनच भाव खाऊन जातो. अॅक्शनदृश्यं करताना ती स्वाभाविक दिसतील याचीही काळजी त्यानं घेतलीय.
प्रियांका आणि कंगना
ऋतिकच्या पत्नीच्या भूमिकेत प्रियांका चोपडा दिसते. या सिनेमात प्रियांकाला फार काही करण्याला वाव नाही. सिनेमातील महत्तवाची भूमिका मिळाल्यानं कंगना अनेक ठिकाणी प्रियांकाला मागे टाकते.

संगीत
सिनेमाचं बॅकग्राऊंड संगीत सलीम आणि सुलेमान यांनी दिलंय. लोकांना हे संगीत बऱ्यापैंकी श्रवनीय आहे. परंतु, राजेश रोशन यांचे साऊंडट्रॅक्स मात्र फार प्रभाव पाडू शकलेले नाहीत.
क्रिश ३ मध्ये बऱ्याच गोष्टी हॉलिवूडच्या सुपरहिरो सिनेमांप्रमाणे घेण्यात आल्यात. सिनेमातील अॅक्शन दृश्यं बऱ्यापैंकी जमली आहेत. शेवटी काय तर ‘क्रिश ३’ ला एकदा तरी नक्कीच बघितलं जाऊ शकतं... हा सिनेमा नक्कीच तुमचं मनोरंजन करेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 1, 2013 - 19:36
comments powered by Disqus