`बॉस`चं पोस्टर गिनिज बुकमध्ये!

अक्षय कुमारच्या आगामी ‘बॉस’ या सिनेमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या सिनेमाने सर्वांत मोठं पोस्टर तयार करून मायकल जॅक्सनच्या ‘धिस इज इट’ या आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या पोस्टरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 10, 2013, 04:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
अक्षय कुमारच्या आगामी ‘बॉस’ या सिनेमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या सिनेमाने सर्वांत मोठं पोस्टर तयार करून मायकल जॅक्सनच्या ‘धिस इज इट’ या आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या पोस्टरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे आणि गिनिज बुकमध्ये स्थान पटकावलं आहे.
अक्षय कुमारच्या फॅन क्लबने भलं मोठं पोस्टर तयार केलं आहे. सामान मिळाल्यावर अवघ्या चार महिन्यांत हे पोस्टर तयार करण्यात आलं आहे.
या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना अक्षय कुमार म्हणाला, “ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, त्या सर्वांचा मी आभारी आहे.”
हे पोस्टर ५८.८७ मीटर रुंद आहे आणि ५४.९४ मीटर उंच आहे. ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ब्रिटनमधील लिटिल ग्रँस्डन एअरफिल्ड येथे या पोस्टरचं उद्घाटन झालं. माय़कल जॅक्सनचं पोस्टर बनवणाऱ्या मॅक्रो आर्ट्स (युके) या कंपनीनेच बॉसचं पोस्टर तयार केलं आहे. येथेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.
‘बॉस’ सिनेमात अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती, डॅनी डेग्झंपा, आदिती राव हैदारी आणि परिक्षित साहनी यांच्या महत्वाच्या भूमिका आहे. १६ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.