<B><font color=red>व्हिडिओ पाहा :</font></b>`धूम ३`मध्ये आमिर जोकरच्या भूमिकेत

यावर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ठरलेल्या ‘धूम ३’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमात आमिर खान एका जोकरच्या भूमिकेत दिसतो. वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून चोरी करणं, ही त्याची खूबी...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यावर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ठरलेल्या ‘धूम ३’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमात आमिर खान एका जोकरच्या भूमिकेत दिसतो. वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून चोरी करणं, ही त्याची खूबी... महत्त्वाचं म्हणजे, या सिनेमात पहिल्यांदाच आमिर खान आणि कतरिना कैफ एकत्र दिसणार आहेत.
आमिरच्या यंदाच्या सिनेमाची प्रेक्षक मोठ्या आतूरतेनं वाट पाहत आहेत. हा सिनेमा २० डिसेंबरला रिलीज होणार आहे, परंतु सिनेमाचं प्रमोशन आत्तापासूनच सुरू झालंय आणि तेही धूमधडाक्यात... या सिनेमात आमिरसोबत कतरीना कैफ, आदित्य चोपडा, अभिषेक बच्चन यांच्याही भूमिका आहेत.

तसंच या सिनेमात जॅकी श्रॉफही महत्त्वाच्या भूमिकेत आहे बऱ्याच कालावधीनंतर जॅकी प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केलंय. याआधी आलेल्या धूम (२००४), धूम-२ (२००६) या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर आपली चांगलीच छाप उमटवली होती. आता प्रतिक्षा आहे ती ‘धूम-३’ची....
व्हिडिओ पाहा :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.