`२ स्टेटस्` : दोन भिन्न संस्कृतींची प्रयोगशील कथा

एखादं कथानक एखाद्या उत्तम दिग्दर्शकाच्या हाताला लागला की त्याचा काय प्रभाव पडू शकतो, असं तुम्हालाही `२ स्टेटस्` चित्रपट पाहून नक्कीच वाटेल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 19, 2014, 09:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एखादं कथानक एखाद्या उत्तम दिग्दर्शकाच्या हाताला लागला की त्याचा काय प्रभाव पडू शकतो, असं तुम्हालाही `२ स्टेटस्` चित्रपट पाहून नक्कीच वाटेल. चेतन भगत लिखित कादंबरीवर आधारीत `२ स्टेटस्` हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकलाय... या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे अभिषेक वर्मन... या चित्रपटातून अभिषेकनं दिग्दर्शक म्हणून कथेच्या पायावर चांगलंच काम केलेलं दिसतंय. अभिजीत जोशी आणि अभिषेक कपूरच्या टीमनं पटकथेवरही उत्तम काम केल्याचं जाणवतं... आणि यामुळेच प्रेक्षकांना एक फ्रेश फिल्म पाहण्याची संधी मिळतेय.
सिनेमाचं कथानक
सिनेमाचं कथानक अगदी रुटीन टाईप आहे... परंतु, दिग्दर्शक अभिषेकनं आपल्या प्रतिभेनं हे या कनानकाला चांगलाच उजाळा दिलाय. सिनेमाचं थोडक्यात कथानक सांगायचं झालं तर... एक तरुण मुलीची एका तरुण मुलाशी भेट होते. दोघंही एकमेकांच्या प्रेम पडतात. आपण लग्न करायला हवं या निर्णयापर्यंत ते येऊन पोहचतात... पण, पुन्हा आड येतं ते त्यांचे कुटुंबीय. दोघांच्याही कुटुंबाला या दोघांचा हा निर्णय फारसा रुचलेला दिसत नाही... मग काय, बिचारे मुलगा आणि मुलगी एकमेकांपासून वेगळे होतात... ही कथा तुम्हाला अगोदरही बऱ्याचदा ऐकलेली वाटतेय ना... परंतु, या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे कथा पूर्ण झाल्यानंतर या सिनेमात काहीतरी नवीन पाहायला मिळतं.
आंतरजातीय प्रेमाची कथा...
कृष मल्होत्रा (अर्जुन कपूर) आणि अनन्या स्वामीनाथन (आलिया भट्ट) आयआयएम-अहमदाबादमध्ये एकेकांना भेटतात. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. कृष एक पंजाबी मुलगा आहे तर अनन्या दक्षिण भारतीय. नात्यांमधील तेढ आणि आपापल्या संस्कृतीवर अनेक मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ही कथा आपल्याशी खुपच रिलेटेड वाटू शकते. चेतन भगतच्या `टू स्टेटस्` या कादंबरीवर आधारित या कथेवर दिग्दर्शकानं नवीन आणि चांगले प्रयोग केलेत.
कलाकार
संपूर्ण सिनेमात आलियाचा फ्रेशनेस आणि तजेलदारपणा खूप सुंदर रितीनं चित्रीत करण्यात आलाय. ती या सिनेमात इतकी सुंदर दिसतेय की पुन्हा-पुन्हा तिला पाहावसं वाटत राहतं. तिची प्रेमकहानी आणि अंदाज पाहून संघर्षमध्ये दिसलेली छोटी आलिया सारखी आठवतं राहते. एक सुपरस्टार बनण्याची तिच्यातली धमक या चित्रपटातून ठासून पुढे येताना दिसतेय. अर्जुननंही कृषच्या भूमिकेत जिवंतपणा आणलाय. अभिनयाच्या बाबतीत तो आपल्या प्रत्येक सिनेमासोबत उजळून निघताना दिसतोय.
सिनेमात सहकलाकारांनीही आपापल्या भूमिका उत्तम निभावल्यात. अमृता सिंह मुलीच्या आईच्या रुपात फिट्ट बसलीय. तर एका तामिळ महिला आणि कृषच्या आईची भूमिका निभावणारी रेवती प्रेक्षकांना निराश करत नाही. पित्याच्या रुपात रोनित रॉयनंही चांगलं काम केलंय. या सिनेमात अर्जुन कपूरनं आपली `अँग्री यंग मॅन`ची इमेज थोडी बाजुला ठेवलीय आणि एका रोमांटिक रुपात तो प्रेक्षकांसमोर आलाय.
एकूणच काय तर....
एकूण काय तर... बऱ्याच कालावधीनंतर ट्रॅकपेक्षा थोडा हटके सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल झालाय... आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबीयांसोबत तुम्ही हा सिनेमा चांगलाच एन्जॉय करू शकता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.