मराठी सिनेसृष्टीतील ‘आनंद’ हरपला

हरहुन्नरी अभिनेते आनंद अभ्यंकर (५०) आणि अक्षय पेंडेसे (३३) यांचं कार अपघातात निधन झालंय. त्यांच्या कारकीर्दीवर एक दृष्टीक्षेप.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2012, 03:37 PM IST

www.24taas.com,मुंबई
हरहुन्नरी अभिनेते आनंद अभ्यंकर (५०) आणि अक्षय पेंडेसे (३३) यांचं कार अपघातात निधन झालंय. त्यांच्या कारकीर्दीवर एक दृष्टीक्षेप.
आनंद अभ्यंकर हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण गरवारे कॉलेजमध्ये झाले. अनेक लोकप्रिय झालेल्या मराठी मालिकांमध्ये आनंद अभ्यंकर यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत. शुभंकरोती, या गोजीरवाण्या घरात या त्यांच्या गाजलेल्या भूमिका असलेल्या मालिका होय.
रंगभूमी आणि मराठी स्मॉल स्क्रीनवर गाजलेली दोन नावं म्हणजे आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे. आजवर या दोघांनीही अनेक मालिका आणि नाटकांमधून आपल्या अभियनाचा ठसा उमटवलाय. मग ते असंभवमधले दीनानाथ शास्त्री असो, किंवा मला सासू हवीमधील आबा असो. नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका आनंद अभ्यंकरांनी साकारल्यात.
स्मॉल स्क्रीन म्हणजे आनंद अभ्यंकर आणि आनंद अभ्यंकर म्हणजेच स्मॉल स्क्रीन हे जणू एक समीकरणंच झालं होतं.. मराठी मालिकांप्रमाणेच पप्पा सांगा कुणाचे, कुर्यात सदा टिंगलम या नाटकांमध्येही त्यांनी काम केलं होतं.. तर बालगंधर्व, जिस देश मै गंगा रहता है, रात्रआरंभ, मातीच्या चुली या सिनेमांमध्येही आनंद अभ्यंकरांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या.

प्रायोगिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नाव म्हणजे अक्षय पेंडसे. माझ्या वाटणीचे खरेखुरे, सिगारेट्स या प्रायोगिक नाटाकांमधून रंगभूमीला आपली दखल घेण्यास अक्षयने भाग पाडलं होतं. तर उत्तरायण या सिनेमात अक्षयने साकारलेली भूमिकाही तितकीच महत्वाची होती. मात्र, आता या दोघांचही दर्शन आपल्याला मराठी मालिकांमधून किंवा रंगभूमीवर घडणार नाही.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानी मराठी रंगभूमी आणि मराठी स्मॉल स्क्रीनचे दोन तारे निखळल्याची हळहळ व्यक्त होतेय. `झी मराठी` या टीव्ही चॅनेलवर सुरू असलेल्या `मला सासू हवी` या मालिकेत आनंद अभ्यंकर यांनी वडिलांची तर अक्षय पेंडसे यांनी मुलाची भूमिका साकारली होती.

बडबडे आनंद
लहानपणापासून मी बडबड्या होतो. मला गोष्टी रचून सांगायला जास्त आवडायच्या. नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण झालं. लहान असल्यापासून मी गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचो. त्यामुळे तिसरी-चौथीत असताना माझ्यावर गॅदरिंगमधल्या नाटकाची जबाबदार सोपवली होती, असे आनंद अभ्यंकर सांगायचे.
त्यांनी एक नाटकाचा किस्सा सांगितलाय. तो असा, मात्र नाटकातला एक मुलगा अचानक आला नाही हे कळलं आणि काही सुचेनासं झालं. ऐनवेळी त्या मुलाच्या जागी मला उभा केलं. नाटक सुरू झालं आणि मला काहीच माहीत नसल्याने मी भलतेच मनाचे श्लोमक बोलू लागलो. माझ्या मनाच्या डायलॉग्समुळे माझे बाकीचे सहकारी अडकले. मी मात्र अक्षरश: सुटलो होतो. शेवटी नाटक थांबवावं लागलं.
तो आनंद गगनात
लहानपणी शाळेतची सहल महाबळेश्व/रला गेली होती. त्यावेळी मी त्या मार्केटमध्ये हरवलो. त्यावेळी मला वाटलं आता आयुष्यभर इथेच थांबायचं. माझे आई-बाबा मला कधीच सापडणार नाहीत. पण सुदैवाने मला नंतर सगळे भेटले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. बालपण म्हणजे कुंभाराच्या चाकावरचं मडकं असतं. हे बालपण प्रत्येकाला एकदाच जगता येतं. मात्र त्या जगण्यातल्या आठवणी कायमस्वरूपी मनात साठून रहातात.
आनंद अभ्यंकर यांची कारकीर्द
चित्रपटात भूमिका - वास्तव (हिंदी) (१९९९) , जिस देश मे गंगा रहता है (हिंदी) (२०००) , अकलेचे कांदे (२००१), तेरा मेरा सात (२००१), मातीच्या चुली (२००६), मुलगी कोणाची (२००६), चेकमेट (२००८), बालगंधर्व (२०११), स्पंदन, आनंदाचे झाड, आयडियाची कल्पना
टी व्ही मालिका – असंभव, तारक मेहता का उलटा चष्मा, फू बाई फू, मला सासू हवी
अक्षय पेंडसे याची सुरूवात
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात उद्घोषक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणा-या अक्षयने अतुल परचुरेसोबत ' मि. नामदेव म्हणे ', ' खरं सांगायचं म्हणजे ' यासारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये अभिनय केला होता.
‘उत्तरायण’ चित्रपटातही त्याने शिवाजी साटम यांच्या मुलाची भूमिका केली होती. सध्या तो ' मला सासू हवी ' या मालिकेत प्रम