अभिनेता सुनिल शेट्टीच्या भावाची रस्त्यावर दबंगगिरी

अभिनेता सुनिल शेट्टी याचा चुलतभाऊ अजय शेट्टी याची दबंगगिरी शनिवारी मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळाली. क्षुल्लक वादातून अजय शेट्टी आणि त्याच्या चालकानं `बेस्ट` बसच्या चालकाला बेदम मारहाण केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 5, 2014, 06:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता सुनिल शेट्टी याचा चुलतभाऊ अजय शेट्टी याची दबंगगिरी शनिवारी मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळाली. क्षुल्लक वादातून अजय शेट्टी आणि त्याच्या चालकानं `बेस्ट` बसच्या चालकाला बेदम मारहाण केली.
शनिवारी दुपारी लोअर परळ इथल्या अंबिका मिलसमोर ही घटना घडली. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. दुपारी पाऊणच्या सुमारास `बेस्ट` बसनं मर्सिडीज गाडीला धडक दिली. या गाडीत अभिनेता सुनिल शेट्टी याचा चुलतभाऊ अजय शेट्टी होता. त्यानं तसंच मर्सिडीजचा चालक श्यामनारायण मिश्रा या दोघांनी `बेस्ट` बसचा चालक राजकुमार शिंदे (३६) याला बेदम मारहाण केली. शिंदे यांच्यावर नंतर नायर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चालक मिश्रा याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर घागरे यांनी दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.