आदित्य पांचोलीने काढला मीडियावर राग

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्याप्रकरणी चौकशी पोलिसांनी केली. मात्र, आदित्यचे काय म्हणणे आहे, याबाबत मीडियाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मीडियाच्या ट्रायपोडवर गाडी चालवून आदित्य पांचोलीने मीडियावर राग काढला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 5, 2013, 01:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्याप्रकरणी चौकशी पोलिसांनी केली. मात्र, आदित्यचे काय म्हणणे आहे, याबाबत मीडियाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मीडियाच्या ट्रायपॉडवर गाडी चालवून आदित्य पांचोलीने मीडियावर राग काढला.
जिया खानचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून त्याच्याकडून माहिती घेतली. काल रात्री जिया खान आत्महत्येपूर्वी मोबाईलवरून सुरजसोबत बोलत होती. त्यामुळे चौकशीसाठी त्याला पोलिसांनी बोलावून घेतलं आहे. सुरज हा अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. आदित्यच्या चौकशीअंती काही माहिती बाहेर येतेय का याचा तपास आता पोलिसांकडून केला जातो आहे.

दरम्यान दोन महिन्यांपासून जिया आणि सुरज बोलत नव्हते, त्यांच्यात काही वादविवाद होते, अशीही माहिती समोर येतेयं. मात्र त्या दोघांमध्ये घनिष्य मैत्री होती, अशीही माहिती मिळतेय. त्यामुळे सूरजबरोबर आदित्य पांचोलीची चौकशी करण्यात येणार होती. याचदरम्यान, मीडियाने आदित्यशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्यने गाडीतून काहीही न बोलता थेट मीडियाच्या ट्रायपॉडवर गाडी घालून आपला राग व्यक्त केला. या प्रकाराचा निषेध व्यक्त होता आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.