अदनान सामी आत्ताच भारत सोडून जाणार नाही!

गृह मंत्रालयानं पाकिस्तानी गायक-संगीतकार अदनान सामीच्या भारतीय व्हिजाचा कालावधी वाढवून दिलाय. अदनानला आता आणखी तीन महिने भारतात राहण्याची परवानगी दिली गेलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 17, 2013, 04:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गृह मंत्रालयानं पाकिस्तानी गायक-संगीतकार अदनान सामीच्या भारतीय व्हिजाचा कालावधी वाढवून दिलाय. अदनानला आता आणखी तीन महिने भारतात राहण्याची परवानगी दिली गेलीय. गेल्या आठवड्यात त्याच्या व्हिजाचा निर्धारित कालावधी संपला होता.
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) संजय शिंत्रे यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, अदनानच्या व्हिजाचा कालावधी ०६ ऑक्टोबर रोजी समाप्त झाला होता. ‘एमएमचए’नं ०६ ऑक्टोबरपासून तीन महिन्यांचा कालावधी वाढवून दिलाय. आणखी एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शिंत्रे यांच्या कार्यालयात मंत्रालयाचा फॅक्स आला होता. या फॅक्समध्ये गायक अदनान सामी यांच्या व्हिजाचा अवधी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आल्याची सूचना दिली होती.

भाजपच्या महाराष्ट्र शाखेनं काल, पाकिस्तानी गायक अदनान सामीनं वर्ष २००९ पासून आयकर भरला नसल्याचा आरोप केला होता. अदनानला काल मुंबई पोलिसांनीही व्हिजाचा कालावधी समाप्त झाल्यानंतरही भारतात राहण्यावरून नोटीस जारी केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close