`अभि-अॅश`च्या लग्नाचा सहावा वाढदिवस...

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन... चाहत्यांची बॉलिवूडमधली एक आवडती जोडी... अभिषेक-ऐश्वर्या यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली... आज ते आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 20, 2013, 12:59 PM IST

www.24taas.com, मुंबई
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन... चाहत्यांची बॉलिवूडमधली एक आवडती जोडी... अभिषेक-ऐश्वर्या यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली... आज ते आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत आहेत.

बॉलिवूडमधलं `सुपर कपल` म्हणून ओळखले जाणारे अभि-ऐश पहिल्यांदा १९९७ मध्ये एकमेकांना भेटले होते. जेव्हा ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावत होती आणि अभि तर बॉलिवूडकरांना फारसा परिचितही नव्हता... `ऑगस्ट १०९७ मध्ये ऐश्वर्याला मी पहिल्यांदा भेटले होतो. तेव्हा मी माझ्या वडिलांच्या मृत्यूदाता या सिनेमाच्या रेकीसाठी स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि ती तेव्हा तिचा पहिलाच सिनेमा और प्यार हो गयाच्या शूटमध्ये व्यस्त होती... आणि मला आठवतं तेव्हा बॉबी देओलनं मला त्यांच्या हॉटेलवर डिनरसाठी बोलावलं होतं. तिथं और प्यार हो गयाच्या टीमसोबत ऐश्वर्यादेखील उपस्थित होती आणि हीच अॅश आणि माझी पहिलीच भेट होती.`

नंतर, १४ जानेवारी २००७ मध्ये अमिताभ बच्चन यांनी अॅश-अभिचा साखरपुड्याची तारीख जाहीर केली आणि २० एप्रिल २००७ रोजी हॅपी कपल लग्नाच्या बेडीत अडकलं. `प्रतिक्षा`वर त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

ऐश्वर्यानं नोव्हेंबर २०११ मध्ये `आराध्या`ला जन्म दिला आणि अभि-ऐशच्या संसाराची कळी आणखीनच खुलली... याच आवडत्या जोडप्यासाठी सर्व चाहत्यांकडून `लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...`