अक्षय कुमार काढतोय दादा कोंडकेंवर सिनेमा!

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, October 31, 2013 - 18:20

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टी पूर्ण होऊच शकत नाही असा अभिनेता म्हणजे दादा कोंडके. स्वत:ची खास अशी शैली दादा कोंडकेनी निर्माण केली.
आता अभिनेते-दिग्दर्शक असलेल्या दादा कोंडके यांच्या जीवनावर लवकरच मराठी चित्रपट येणार आहे. अनिता पाध्ये यांनी शब्दांकन केलेल्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रावर आधारित सिनेमाची कथा आहे. महत्वाचं म्हणजे अभिनेता अक्षय कुमारने या पुस्तकाचे हक्क विकत घेतलेत. ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’तर्फे या चित्रपटाची निर्मीती केली जाणार आहे.
अक्षय कुमारचं मराठी भाषेवरील प्रेम यापूर्वीच मराठी प्रेक्षकांनी अनुभवलंय. यापूर्वीही अक्षय कुमारने ‘७२ मैल- एक प्रवास’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. आता दादा कोंडकेंवर तयार होणाऱ्या सिनेमात दादा कोंडकेंची भूमिका कुणाला दिली जाणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013 - 18:20
comments powered by Disqus