आमिर खानचा अमेरिकेत सन्मान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अमेरिकेत सन्मानित करण्यात आलयं.. अमेरिकेचा प्रतिष्ठित इनॉगरल अमेरिका अब्रॉड मीडिया एवॉर्ड आमिरच्या सत्यमेव जयते शोला मिळालाय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 30, 2013, 11:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अमेरिकेत सन्मानित करण्यात आलयं.. अमेरिकेचा प्रतिष्ठित इनॉगरल अमेरिका अब्रॉड मीडिया एवॉर्ड आमिरच्या सत्यमेव जयते शोला मिळालाय..
अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो आणि या मिस्टर परफेक्शनिस्टची दखल आता विदेशातही घेतली गेलीए.. आमिरचा बहुचर्चित टिव्ही शो सत्यमेव जयतेला अमेरिकेत पुरस्कार प्रदान कऱण्याच आला आहे.. देशातील अनेक ज्वलंत विषय आमिरनं या शोमधून मांडले..
सत्यमेव जयतेला `इनॉग्रल अमेरिका ऍब्रॉड मीडिया` ऍवॉर्डनं सन्मानित करण्यात आलयं.. आपण देशात केलेल्या कामाची दखल देशाशिवाय विदेशातही घेतली जाते याचा आपल्याला अंदाजच नव्हता अशी प्रतिक्रिया आमिरनं पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली.. हा शो करताना आपण देशातील छोट्या छोट्या समस्यांना जवळून अनुभवल्याचही आमिर सांगतो.. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आमिर भारावून गेला होता.. खरतर आमिर कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावत नाही.. पण हा पुरस्कार मात्र आमिरनं स्वत: स्विकारला.. या कार्यक्रमाला आमिरसोबत आमिरची पत्नी किरण रावही उपस्थित होती.. या कार्यक्रमच्या पुढच्या भागांच काम सुरु झाल्याचही आमिरनं यावेळी सांगितलं..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.