...राहिल्या फक्त आठवणी – बिग बी

आपल्या अभिनयाने सगळ्यांना भारावून टाकणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते प्राण हे आता आपल्यात राहिलेले नाहीत. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली देताना आपल्या ब्लॉगवर महानायक अमिताभ बच्चन यांनी प्राण यांच्या आदरार्थ त्यांना एक जेंटलमॅन आपल्यातून निघून गेले असे म्हटले आहे.

Updated: Jul 14, 2013, 08:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
आपल्या अभिनयाने सगळ्यांना भारावून टाकणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते प्राण हे आता आपल्यात राहिलेले नाहीत. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली देताना आपल्या ब्लॉगवर महानायक अमिताभ बच्चन यांनी प्राण यांच्या आदरार्थ त्यांना एक जेंटलमॅन आपल्यातून निघून गेले असे म्हटले आहे.
आपले सगळ्यात जवळचे सहयोगी, वरिष्ठ मित्र गेले. बरोबरच बॉलिवूडमधील चित्रपट उद्योगातील आणखी एक मजबूत पाया ढासळला, असे सांगत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जाता जाता त्यांनी आपल्यासाठी खूप मोठे दस्तैवजीकरण करुन गेले आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांना धन्यवादही म्हटले आहे. ते आपल्या कामाशी कायम प्रामाणिक राहिले. आपल्या कामाने कायम त्यांनी लोकांना खेळवून धरेले असेही ते पुढे म्हणाले. एका जवळच्या व्यक्तीने म्हटले आहे, ते म्हणजे ज्याच्याशी आपण कधीच मैत्रीचा हात पुढे करत नाही त्या व्यक्तीला आपण कायमचे गमावून बसतो. पण, त्याच्यासारखा दुसरा कोणताही व्यक्ती आपण पुन्हा बनवू शकत नाही.

अमिताभ बच्चन यांनी जंजिर या सुपरहीट चित्रपटात प्राणबरोबर काम केलं होतं. याशिवाय अमर अकबर अॅथनी, नसीब, शराबी, अंधा कानून, डॅान, कालिया यासारख्या अनेक सुपरहिट, गाजलेल्या चित्रपटातही अमिताभ बच्चन यांनी प्राणबरोबर काम केलं आहे. त्यांच्या चित्रपटांच्या आठवणीही अजूनही त्यांच्या मनात तशाच ताज्या आहेत. गेल्या बऱ्याच दिवसापासून आजारी असल्यामुळे शुक्रवारी लीलावती रुग्णालयात प्राण यांनी अखेरचा श्वास घेतला. ९३ वर्षीय प्राण आता आपल्यात नाहीत याची हळहळ अमिताभ बच्चन यांना कायम राहिल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.