बिग बी दिलीप कुमार यांच्या भेटीला!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी बिग बींनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

| Updated: Sep 24, 2013, 10:43 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
बिग बी अमिताभ बच्चन यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी बिग बींनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
काही दिवसांपूर्वी प्रक्रृती बिघडल्यामुळं लिलावती रुग्णालयात दाखल केलं होत. त्यानंतर दिलीप कुमार लवकर बरे व्हावेत यासाठी देशभरात ठिकठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर दिलीपकुमारांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होतेय. त्यांना आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलंय.
साऱ्यांचे लाडके दिलीपकुमार फिट एंड फाइन असल्याचं दिसतंय. सर्वांनीच केलेल्या दुवा आणि दवा याचा परिणाम दिसून येतोय. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.