आसाराम बापूंवर बॉलिवूड फिदा!

सध्या अटकेत असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंवर बॉलिवूड फिदा झालंय. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांचा आसाराम बापू आवडता विषय बनलेत. नुकताच प्रकाश झा यांनी आसाराम बापूंवर आधारित ‘सत्संग’ चित्रपटाची घोषणा केलीय. तर आता आसाराम यांच्यावर आणखी एक चित्रपट येणार असल्याचं कळतंय. चित्रपटाचं नाव आहे ‘चल गुरू हो जा शुरू’…

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 8, 2013, 08:43 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या अटकेत असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंवर बॉलिवूड फिदा झालंय. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांचा आसाराम बापू आवडता विषय बनलेत. नुकताच प्रकाश झा यांनी आसाराम बापूंवर आधारित ‘सत्संग’ चित्रपटाची घोषणा केलीय. तर आता आसाराम यांच्यावर आणखी एक चित्रपट येणार असल्याचं कळतंय. चित्रपटाचं नाव आहे ‘चल गुरू हो जा शुरू’…
‘चल गुरू हो जा शुरू’ या चित्रपटात ‘ऑफिस ऑफिस’ मालिकेतील पांडेजी या भूमिकेद्वारे प्रसिद्ध असलेले हेमंत पांडे आसाराम बापूंची भूमिका साकारणार आहेत. याबाबत हेमंत पांडेंना विचारलं असता त्यांनी आपल्या भूमिकेचं नाव जाहीर केलं नसलं तरी ‘चल गुरू हो जा शुरू’मध्ये आपली महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं.
हा चित्रपट पूर्णपणे भोंदूबाबांवर आधारित असून हा एक व्यंगात्मक चित्रपट आहे. सामान्य जनतेला भुलवणाऱ्या अशा स्रर्व भोंदूबाबांचा पर्दाफाश या चित्रपटात करण्यात आलाय. हिमालयन ड्रीम्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात चंद्रचूड सिंह, संजय मिश्रा, मनोज पाहवा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘चल गुरू हो जा शुरू’ला दिग्दर्शन मनोज शर्मा यांचं असून प्रवीण भारद्वाज यांचं संगीत चित्रपटाला लाभलंय. २०१० मध्ये दिग्दर्शक मनोज शर्मा यांनी आसाराम बापूंवरच आधारित ‘स्वाहा’ हा चित्रपट बनवला होता. जो की वादग्रस्त ठरला होता आणि अनेक अडचणींनंतर रिलीज झाला होता.
‘चल गुरू हो जा शुरू’चं शूटिंग १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून मार्च-एप्रिलमध्ये चित्रपट रिलीज होईल, असं दिग्दर्शक शर्मा यांच्याकडून सांगण्यात आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.