ना`पाक` हल्ल्याचे बॉलीवूडमध्ये तीव्र पडसाद

पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा निषेध सध्या सर्वत्र होतोय. बॉलीवूडमध्येही याचे तीव्र पडसाद उमटतायंत. पाकला जशास तसं उत्तर द्या, अशी तीव्र प्रतिक्रिया बॉलिवूडमधून व्यक्त केली जातेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 9, 2013, 07:27 AM IST

www.24taas.com,झी मीडीया, मुंबई
पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा निषेध सध्या सर्वत्र होतोय. बॉलीवूडमध्येही याचे तीव्र पडसाद उमटतायंत. पाकला जशास तसं उत्तर द्या, अशी तीव्र प्रतिक्रिया बॉलिवूडमधून व्यक्त केली जातेय.
अभिनेता रितेश देशमुख, सुनिती चौहान, हर्षद वारसी यांनी चिड व्यक्त केली आहे. सिनेमाच्या पडद्यावर हिरोच्या तोंडून असे देशभक्तीचे कडक डायलॉग्ज ऐकले, की प्रेक्षकांमध्येही देशभक्तीचे वारे वाहू लागतात. मात्र सिनेमा संपला. की जणू रात गयी, बात गयी...पाकिस्तानकडून वारंवार पाठित खंजीर खुपसला जातोय. याहीवेळी जम्मूतल्या पूँच्छ भागात पाकच्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झालेत. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटताहेत. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची खरी वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया बॉलिवूडमध्येही उमटू लागलीये.

पाकिस्तानकडून जाणूनबुजून असे हल्ले घडवले जातायंत. आपण मात्र दरवेळी फक्त निषेध करत बसतो.तीन वर्षांपूर्वीही भारताच्या हद्दीत घुसून आठ भारतीय जवानांचं शिर धडावेगळं करण्याची संतापजनक घटना घडली होती. त्याहीवेळी आपल्या सरकारने नेहमीप्रमाणेच आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा वरवरचा दम भरला होता. पाकच्या पापांचा घडा आता भरलाय, एवढं मात्र निश्चित.
पाकच्या या नापाक कृत्यांना आपण काय फक्त सिनेमाच्या पडद्यावरच उत्तरं देणार आहोत का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय. वारंवार होणारे हल्ले आणि त्यात शहीद होणारे आपले जवान. हेच चित्र आपण कुठपर्यंत पाहात रहायचं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.