गोव्यात ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध ?

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, November 27, 2013 - 15:04

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
गोव्यात धक्कादायक सत्य उघड झाले आहे. गोव्यातील बिचवर ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध होतात, अशा दावा ‘बागा बिच’चे निर्माता प्रमोद साळगावकर यांनी केला आहे.
साळगावकर गोव्यातील पर्यटन उद्योगावर आधारित एक सिनेमा काढत आहेत. ‘बागा बिच’ असे या सिनेमाचे नाव आहे. हंगरीच्या एका पर्यटकाने ही माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. पर्यटकांना ५० रूपयांमध्ये मुलं सेक्ससाठी पाठविली जातात. ही माहिती सलगावकर यांनी एका वार्ताहर संम्मेलनात दिली. याचवेळी ते म्हणालेत, आजच्या युगात ५० रूपयांमध्ये कोंबडाही मिळत नाही.
गोव्यामध्ये याआधी सेक्ससाठी मुलांचा वापर केला गेला आहे. जर्मन नागरिक फ्रेडी पेट्सने १९८०मध्ये मुलांचा वापर सेक्ससाठी केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. याबाबत त्यांना शिक्षाही झाली होती. लक्ष्मीकांत शेतगांवकर निर्देशित `बागा बीच` या सिनेमात गोवातील बाल लैंगिक शोषणबरोबरच पर्यटन विषयक गोष्टींचा महत्व दिले गेले आहे. लक्ष्मीकांत यांनी सांगितले की, गोव्यात दररोज चार मुलांचे लैंगिक शोषण होत आहे. हा आकडा सरकारी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 27, 2013 - 13:11
comments powered by Disqus