हे वादग्रस्त सेलिब्रिटी असणार आहेत `बिग बॉस ७` मध्ये!

आपापसातील भांडणं, वाह्यातपणा, अश्लील चाळे, स्वस्त पब्लिसिटी, गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा गोष्टींमुळे बिग बॉस कार्यक्रम कायम वादग्रस्त ठरतो. यंदाचा सातवा सिझन चांगला विरुद्द वाईट असा असणार आहे. यंदा यात सहभागी होणारे सेलिब्रिटी कोण आहेत, याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र तरीही चौदा सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत.

जयवंत पाटील | Updated: Sep 15, 2013, 03:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोचा सातवा सिझन सुरू होणार आहे. या शोमध्ये यंदा कोणकोणते सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होणार आहेत, याबद्दल सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिझनमधील १४ स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.
बिग बॉस या कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या आयुष्याची दुसरी बाजूही उघड होत असते. आपापसातील भांडणं, वाह्यातपणा, अश्लील चाळे, स्वस्त पब्लिसिटी, गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा गोष्टींमुळे बिग बॉस कार्यक्रम कायम वादग्रस्त ठरतो. यंदाचा सातवा सिझन चांगला विरुद्द वाईट असा असणार आहे. यंदा यात सहभागी होणारे सेलिब्रिटी कोण आहेत, याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र तरीही चौदा सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत.
प्रत्युषा बॅनर्जी
गौहर खान
हेजल कीच
कामया पंजाबी
संग्राम सिंग
अरमान मलिक
अपूर्व अग्निहोत्री
शिल्पा अग्निहोत्री
व्हिजे अँडी
रजत रवैल
अनिता अडवाणी
तनीषा मुखर्जी
कुशल टंडन
रतन रजपूत
हे चौदा जण यंदाच्या बिग बॉसमध्ये पाहायला मिळतील.
प्रत्युषा बॅनर्जीला बालिका वधूमुळे प्रसिद्धी मिळाली होती. तसंच काही दिवसांपूर्वीच तिच्यावर एकावेळी वेगवेगळ्या बॉयफ्रेंड्ससोबत फिरण्याचा आरोप करत बॉयफ्रेंडने भांडण केल्यामुळे ती वादात अडकली होती. अनिता अडवाणी ही दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नांसोबत लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवल्यामुळे आणि डिंपल कपाडिया तसंच अक्षय कुमारविरोधात कोर्टात गेल्यामुळे अडवाणी वादग्रस्त ठरल्या आहेत. तनिषा मुखर्जी ही काजोलची बहीण पुन्हा करीअर घडवण्याच्या प्रयत्नात बिग बॉसमध्ये आली आहे. अपूर्व आणि शिल्पा अग्निहोत्री हे सेलिब्रिटी पती पत्नी ग्लॅमर, रोमान्ससाठी बिग बॉसमध्ये आहेतच. काही काळापूर्वी दोघेही एका रेव्ह पार्टी प्रकरणात अडकले होते.
या सिझनचंही अँकरींग सलमान खानच करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.