जिया मृत्यू प्रकरण आता पोलीस आयुक्तांकडे

Last Updated: Tuesday, April 22, 2014 - 15:58

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उच्च न्यायालयाने जिया खान मृत्यू प्रकरणावर पोलीस आयुक्तांनी निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे.
मुंबईतील अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात काही त्रुटी असतील तसेच काही सूचना करायच्या असतील, तर जियाच्या आईने पोलीस आयुक्तांकडे यासाठी अर्ज करावा आणि आयुक्तांनी यावर निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
जियाचा मृतदेह गळफास गेल्या वर्षी लावलेल्या अवस्थेत राहत्या घरात आढळला. अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज याने प्रेमसंबंधांना पूर्णविराम दिल्यानेच जियाने आत्महत्या केली असल्याचा आरोप करत, या प्रकरणी सूरजवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी याचिका जियाच्या आईने उच्च न्यायालयात केली. यानंतर सूरजविरोधात जियाच्या आईने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता.
यावरील सुनावणीत सरकारी वकील पूर्णिमा कंथारीया यांनी, या तपासावर काही आक्षेप असल्यास जियाच्या आईने रीतसर पोलीस आयुक्तांकडे अर्ज करावा, असा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत न्या. नरेश पाटील यांनी वरील आदेश देऊन ही सुनावणी एक आठवड्यासाठी तहकूब केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Tuesday, April 22, 2014 - 15:57


comments powered by Disqus