आज `खान`वर होणार आरोप निश्चित...

काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर कोर्ट आज आरोप निश्चित करणार आहे. या शिकारप्रकरणात सलमान खानसह सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम आरोपी आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 23, 2013, 10:09 AM IST

www.24taas.com, जोधपूर
गुरुवारी १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा फैसला सुनावताना सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. या धक्क्यातून बॉलीवूड सावरतो न सावरतो तोच आणखी पाच फिल्म स्टार्सच्या कोर्टात सुनावणीचा दिवस उजाडलाय.
काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर कोर्ट आज आरोप निश्चित करणार आहे. या शिकारप्रकरणात सलमान खानसह सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम आरोपी आहेत. त्यामुळं हे बॉलिवूड स्टार्स अडचणीत येण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी सलमान वगळता इतर चौघेजण जोधपूरमध्ये दाखल झालेत. सलमान खान शुटिंगसाठी अमेरिकेत असल्याने तो या सुनावणीसाठी हजर राहणार का याकडं अनेकांचं लक्ष आहे.

जोधपूरच्या कांकाणी गावात १९९८ साली हम साथ साथ है या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी चिंकारा काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे तर या शिकारीच्या वेळी त्याच्यासोबत असणाऱ्या सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर सलमानला उकसवल्याचा आरोप आहे. बॉलीवुडच्या मुन्नाभाईचा फैसला झाला आता दबंग खानचं काय होणार याकडं अनेकांच्या नजरा लागल्यात.