दीपिका पदुकोण सेटवरच रडली

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, September 4, 2013 - 15:36

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२७ वर्षीय अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या भलतीच चर्चेत आहे. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी रॅम्पवर असताना तर आता तर शूटींग सेटवरची दीपिका चर्चेत आहे. तिला रडविले ते एका निर्मात्याने. तिला निर्माता म्हणाला आणि दीपिका सेटवरच रडली.
दीपिका दमदार अॅक्टिंग आणि अदांनी दर्शकांसोबरतच पूर्ण इंडस्ट्री आणि समीक्षकांचेसुद्धा मन जिंकले आहे. तर तिच्या चेन्नई एक्स्प्रेसने २०० कोटींचा गल्ला जमविला. त्यानंतर ती अधिकच चर्चे राहिली आहे. मात्र, आता ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. संजय लीला भन्साली यांनीच दीपिकाला रडविले.
संजय लीला भन्साली यांनी दीपिकाचे कोड कौतुक केले. ती खूप मेहनती आहे. ती एक समजुतदार कलाकार आहे. शूटींगच्या दरम्यान एक सीन खूप कठीण होता. तो करण्याबाबत मी साशंक होतो. पण दीपिकाने सहजपण हा सीन केला. तिचे काम मला मनापासून आवडते. आपले होणारे कौतुक पाहून दीपिका भारावली. ती भावूक झाल्याने तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013 - 15:36
comments powered by Disqus