`धूम ३` मधील गाण्याचा खर्च ५ कोटी......

अमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` चित्रपटाच्या एका गाण्यासाठी तब्बल ५ कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे.

Updated: Nov 27, 2013, 07:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` चित्रपटाच्या एका गाण्यासाठी तब्बल ५ कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे.
प्रदर्शनासाठी केवळ एक महिना शिल्लक असलेल्या धूम ३ या चित्रपटाच्या ‘मलंग’ या गाण्याच्या चित्रिकरणाचा खर्च ५ कोटींच्या घरात गेला आहे. या चित्रपटात अमिर खान,कतरिना कैफ यांच्याबरोबर नेहमी प्रमाणे पोलीस अधिकारी अभिषेक बच्चन आणि त्याला साथ देणारा उदय चोप्रा दिसणार आहेत.
आता पर्यंत हे बॉलिवूडमधला सर्वात महागडे गाण असल्याची चर्चा रंगत आहे. या गाण्यामध्ये सहकार्य करणारे आणि भाग घेतलेल्या २००हून अधिक कलाकारांचे मानधन देखील या ५ कोटी खर्चामधूनच देण्यात आला आहे. या गाण्याची वेशभूषा आणि उभारण्यात आलेल्या सेटच्या निर्मितीस तब्बल दोन महिन्याचा कालावधी लागला असल्याचे सांगण्यात आले आहे. विजय कृष्ण आचार्य यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘धूम ३’ मधील हे खर्चीक गीत लवकराच प्रसिध्द करण्यात येणार आहे.