‘सिंघम २’मध्ये अजयसोबत दीपिका!

`रेस २`, `ये जवानी है दिवानी`, `चेन्नई एक्स्प्रेस` यांतीनही १०० करोड क्लबच्या चित्रपटाची हॉट हिरोईन दीपिकाचं नशीब सध्या जोरात आहे. दीपिका आता `सिंगम २`मध्ये अजय देवगणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Updated: Oct 9, 2013, 06:31 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
`रेस २`, `ये जवानी है दिवानी`, `चेन्नई एक्स्प्रेस` यांतीनही १०० करोड क्लबच्या चित्रपटाची हॉट हिरोईन दीपिकाचं नशीब सध्या जोरात आहे.
दीपिका आता `सिंगम २`मध्ये अजय देवगणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. `सिंगम २`चे चित्रीकरण पुढच्या महिन्यापासून सुरु होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात `सिंगम २` प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दीपिका पादुकोण आणि अजय देवगण पहिल्यांदाच एका चित्रपट करणार असून रोहितसोबत दीपिकाचा हा दुसरा चित्रपट असेल.
रणवीर सिंग आणि तिची प्रमुख भूमिका असलेला `राम लीला` चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दीपिका सध्या `हॅपी न्यू इयर`चे चित्रिकरण करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.