`दुनियादारी`ने केला २५ कोटींचा आकडा पार

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, October 3, 2013 - 18:21

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झी टॉकिझच्या ‘दुनियादारी’ सिनेमाने नवा विक्रम केलाय. य़ा सिनेमाने 12 आठवड्यांमध्ये 25 कोटींचा आकडा पार केलाय.
मराठी चित्रपटांच्या 80 वर्षांच्या इतिहासात 25 कोटींचा आकडा पार करणारा ‘दुनियादारी’ हा पहिलाच सिनेमा ठरलाय. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सुहास शिरवाळकर यांच्या कादंबरीवर आधारित यापूर्वी मालिकाही प्रदर्शित झाली होती. मात्र या मालिकेला तितकेसे यश मिळाले नव्हते. या उलट सिनेमाला मात्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. तसंच, या सिनेमाच्या चलतीमुळे ‘दुनियादारी’ या मूळ कादंबरीचा खपही वाढला आहे.

आजही मोठ्या गर्दीने दुनियादारीचे शोज पार पडत आहेत.. दिवसाला दुनियादारीचे 100 शो पार पडतायेत.. तर विकेण्डला हा आकडा 700 शोजवर गेलाय..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013 - 17:26
comments powered by Disqus