दीपिकानं दिली तिच्या प्रेमाची कबुली!

सध्या दीपिका आणि रणवीर यांच्या केमेस्ट्रीच्या चर्चा खूप रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे यावर चर्चा करायला आणि विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला दीपिकाला खूप आवडतंय, अशी कबुलीच तिनं दिलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 6, 2013, 02:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या दीपिका आणि रणवीर यांच्या केमेस्ट्रीच्या चर्चा खूप रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे यावर चर्चा करायला आणि विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला दीपिकाला खूप आवडतंय, अशी कबुलीच तिनं दिलीय.
‘रामलीला’ या सिनेमातील प्रोमोमध्ये दीपिका आणि रणवीर सिंग यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्रीची प्रशंसा सर्वत्र होत आहे. या प्रशंसेमुळं दोघंही खुश आहेत आणि पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची अपेक्षा ही करत आहेत.
त्यांच्या जोडीबद्दल होत असलेल्या चर्चेविषयी विचारले असता, दीपिकानं सांगितलं की, “आमच्या जोडीविषयी सारख्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याबाबत मी अजून थकली नाही. मला या विषयी बोलण्यात आनंद होतो”.
मला हे सत्य स्वीकार करण्यात काही शरम वाटत नाही. अनेक महत्त्वांच्या गोष्टींपैकी, एक म्हणजे प्रोमो बघून लोक आमच्या जोडीविषयी चर्चा करत आहेत. प्रोमो बघितल्यानंतर त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत, ही अर्थातच चांगली गोष्ट आहे, असं दीपिका रेडिओ स्टेशनवर सिनेमाचा प्रचार करताना म्हणाली.
संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘रामलीला’चा प्रोमो सध्या जोरात चालू आहे. ‘रामलीला’ शेक्सपिअरच्या ‘रोमियो अॅंड जूलियट’ या स्टोरीवर आधारित आहे. जेव्हा आपण उत्कटतेनं परिपूर्ण अशा प्रेम कहाणीमध्ये काम करतो तेव्हा अशा पात्रांमध्ये समन्वयाची गरज आवश्यकच असतं, असं दीपिकानं सांगितलं.
ती म्हणाली, “मला अपेक्षा आहे की लोक या सिनेमात जेव्हा आम्हाला एकत्र बघतिल, तेव्हा प्रत्येकवेळी आम्हाला एकत्र पाहू इच्छितील. मला अपेक्षा आहे की आम्ही पुन्हा एकत्र सिनेमात ही काम करताना दिसू. रणवीर ही दीपिकासह पुन्हा काम करण्याची अपेक्षा करत आहे. ‘रामलीला’ १५ नोवहेंबरला प्रदर्शित होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.