जिया खानची आत्महत्या नाही तर तिचा खून!

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, November 9, 2013 - 17:56

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाबाबत नवीन माहिती पुढे आली आहे. तिने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून झाला असावा, असे सांगितले जात आहे. तसा नवीन फॉरेंसिक रिपोर्ट आला आहे. त्यात म्हटले आहे की जियाने आत्महत्या केलेली नाही. तिला कोणीतरी लटकविले असेल.
या नवीन अहवालानंतर जियाच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. नि:शब्द या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेल्या जियाच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जियाने काम केले. जियाने आत्महत्या केलेली नाही. याप्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी जियाची आई राबिया खान हिने केली होती. त्याबाबत न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. तसेच जुहू पोलिसांनी राबियाचा जबाब घ्यावा असे म्हटले होते.
त्यानंतर फॉरेंसिक रिपोर्ट बाहेर आला आहे. यातमध्ये जियाने आत्महत्या केली नाही. तिला कोणीतरी फाशी लावली असेल, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे तिचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २५ वर्षीय जिया खान ३ जून २०१३ रोजी जुहू अपार्टमेंटमध्ये गळफास लावून घेतलेल्या स्थिती आढळून आली होती. जियाची आई राबिया खान यांनी जियाचा प्रेमी सूरज पंचोली आणि अभिनेता आदित्य पंचोलीचा मुलगा याला मृत्यूप्रकरणी दोषी ठरविले. तसा तिने आरोप केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 9, 2013 - 17:47
comments powered by Disqus