लंडनमध्ये करिनाचा ३३ वा वाढदिवस, Happy birthday Kareena Kapoor Khan!

लंडनमध्ये करीनाचा ३३ वा वाढदिवस

 लंडनमध्ये करीनाचा ३३ वा वाढदिवस
ww.24taas.com, झी मीडिया, लंडन

अभिनेत्री करीना कपूर तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस खास सैफ अली खान सोबत करणार आहे. करीनाचा आज ३३वा वाढदिवस आहे. बेबो लंडनमध्ये जाऊन सैफच्या शूटिंग लोकेशनवर तिचा बर्थ डे सेलिब्रेट करणार असल्याचं समजतय.

सैफ सध्या लंडनमध्ये हमशकल सिनेमाचं शूटिंग करतो आहे. त्याच ठिकाणी करीनाचा वाढदिवस साजरा करण्याता बेत आहे. करीना लग्नानंतर पुन्हा सिनेमात काम करण्यास सज्ज झाली आहे. करण जोहरच्या आगामी शुद्धी या सिमेमात अभिनेता ऋतिक रोशन बरोबर काम करणार आहे. याच वर्षी ती पुनीत मल्होत्रा यांच्या गोरी तेरे प्यार में ती एम मै और एक तूच्या माध्यमातून ती इमरान खान याच्याबरोबर ती सहकलाकार असणार आहे.

करीना आज आपल्या लग्नानंतरच्या पहिल्याच वाढदिनी एक बॉलिवूड दिवा की शैली डायरी या आपल्या पुस्तकाचे प्रकाशनही करणार आहे. करीना मोठ्या दणक्यात आपला वाढदिवस साजरा करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, September 21, 2013, 12:49


comments powered by Disqus