हॅपी बर्थडे किंग खान!

बॉलिवूडमधील ‘किंग खान’ शाहरुख शनिवारी ४८ वर्षीय झाला. शाहरुखानच्या चाहत्यांनी त्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर पोस्टर आणि फटाक्यांसह गर्दी केली होती. त्याने आपल्या चाहत्यांचे सोशल वेबसाईट ट्विटरद्वारा आभार व्यक्त केलेत.

Updated: Nov 2, 2013, 05:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमधील ‘किंग खान’ शाहरुख शनिवारी ४८ वर्षीय झाला. शाहरुखानच्या चाहत्यांनी त्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर पोस्टर आणि फटाक्यांसह गर्दी केली होती. त्याने आपल्या चाहत्यांचे सोशल वेबसाईट ट्विटरद्वारा आभार व्यक्त केलेत.
शाहरुख आपल्या परिवारासह मुंबईतील वांद्र्यातल्या ‘मन्नत’ बंगल्यामध्ये राहतो, त्यामुळे रात्रीच शाहरुखच्या बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. शाहरुखने शुक्रवारी रात्री माइक्रोब्लॉगिंग ट्विटरवर ट्विट केलं की, ‘माझ्या घराबाहेर फटाके आणि पोस्टरसह जमा झालेल्या सर्वांना धन्यवाद आणि प्रेम... शेजाऱ्याना होणाऱ्या त्रासासाठी मी क्षमस्व आहे. तुमचं प्रेम मला नेहमीच आनंद देत आलंय’.
बॉलिवूडमधील रोमॅन्टिक सिनेमांचा किंग असं संबोधल्या जाणाऱ्या शाहरुखला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी, कभी गम’ यांसारख्या सिनेमांनी अपार यश मिळवून दिले. अॅक्शन फिल्म ‘डॉन-२’ आणि विशेष मुद्द्यांवर आधारित ‘माय नेम इज खान’,‘चक दे इंडिया’ आणि ‘स्वदेश’ यासारख्या सिनेमेच्या माध्यमातून त्याच्या अष्टपैलू प्रतिभेची ओळख मिळाली.
नुकताच शाहरुख रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये दिसला होता. सध्या मात्र तो दिग्दर्शक फराह खानच्या ‘हॅपी न्यू ईयर’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.