अनीता अडवाणीला कोर्टाचा झटका

मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नाच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या खटल्याची कार्यवाही १७ डिसेंबरपर्यंत थांबवली आहे. अनिता अडवाणी हिने डिंपल कपाडीया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याविरोधात मारहाणीचा दावा केला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 3, 2012, 04:48 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नाच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या खटल्याची कार्यवाही १७ डिसेंबरपर्यंत थांबवली आहे. अनिता अडवाणी हिने डिंपल कपाडीया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याविरोधात मारहाणीचा दावा केला होता.
न्यायमूर्ती केयू चांदीवाल यांनी उपनगरीय वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात या कार्यवाहीवर स्टे आणताना अनीता अडवाणीलाच नोटीस पाठवली आहे. अडवाणीने दावा केला होता की ती राजेश खन्ना यांच्या सोबत लिव्ह-इन रिलेशनशिमध्ये राहात असून त्यांच्या शेवटच्या दिवसांत तिनेच त्यांची देखभाल केली होती.
मात्र त्यांच्या निधनानंतर राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल आणि जावई अक्षय कुमार यांनी अनीता अडवाणीला बंगल्याबाहेर हाकलून लावलं. त्यामुळे अनीत अडवाणीने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. राजेश खन्ना यांच्या मुली ट्विकल खन्ना आणि रिंकी खन्ना या ही अडवाणीविरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.