अर्जुन म्हणतो, हृतिक-सुझानच्या घटस्फोटाचं कारण मी नाही, Hrithik-Sussanne separation: Not involved, s

अर्जुन म्हणतो, हृतिक-सुझानच्या घटस्फोटाचं कारण मी नाही

अर्जुन म्हणतो, हृतिक-सुझानच्या घटस्फोटाचं कारण मी नाही

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान यांनी आपण एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर या हिट जोडीचं एकमेकांपासून वेगळं होण्याची कारणं काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलाय. अर्जुन रामपालसोबत सुरू असलेल्या प्रेमसंबंधांमुळेच सुझाननं हृतिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय, अशीही चर्चा सुरू होती. या चर्चेला खुद्द अर्जुन रामपालनंच पूर्णविराम दिलाय.

‘तुमच्या अगदी जवळचे मित्र एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतात, ही खूप वाईट गोष्ट आहे. हा खूप कठिण काळ असतो... अशा वेळी अफवा पसरवण्यापेक्षा आणण त्यांच्या निर्णयाबद्दल संवेदनशील असायला हवं... हे लग्न मोडण्यामागे माझा हात आहे, हे जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हाच ते मला समजलं... यामुळे मलाही धक्का बसला. मेहेर (पत्नी) आणि मी या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही शांतता आणि प्रेम मिळो, हीच सदिच्छा व्यक्त करत आहोत’ असं अर्जुननं म्हटलं आहे.

सुझानचे अभिनेता अर्जुन रामपालबरोबरचे `जवळचे` संबंध हृतिकच्या मनात घटस्फोटाचा विचार आणण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरलेत... सुझानच्या पालकांनी अर्जुन रामपालबरोबर बोलणीही केलीय... अशी चर्चा रंगली होती, त्यालाच अर्जुननं हे उत्तर दिलंय. अर्जुनची पत्नी मेहर हिनंही सुझान माझी चांगली मैत्रीण आहे, असं म्हटलंय. अर्जुन हा सध्या दुबईत आहे.इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 15, 2013, 14:06


comments powered by Disqus